---Advertisement---

धडाकेबाज क्रिकेटपटू असूनही ‘दारूडा’ म्हणून ओळखला जाणारा एँड्र्यू सायमंड्स

On: गुरूवार, जून 9, 2022 2:18 PM
Andrew-Symonds
---Advertisement---

अनेक संकटांचा सामना करत रिकी पॉंटिंगच्या ऑस्ट्रेलियन टीमने २००३ वर्ल्डकप जिंकलाच. स्वतः पॉंटिंगने कॅप्टन्स लीड फ्रॉम फ्रंटचे शानदार उदाहरण दिले. इतरही सगळ्यांनी योगदान दिले, पण या सगळ्यात सिंहाचा वाटा उचलणारा होता ऍण्ड्रू सायमंड्स. ज्याला वर्ल्डकपमध्ये एक मॅच खेळायची शाश्वती नव्हती तो सायमंड्स ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप हिरो होता. तो वादग्रस्त होता. तो दारुडा होता. तो मॅच विनरही होता. तरीही सगळ्यांचा फेवरेट होता. तो ऍण्ड्रू सायमंड्स होता. आज (०९ जून) याच सायमंड्सची ४७ वी जयंती आहे.

रग्बी प्लेयरसारखी धष्टपुष्ट बॉडी. तशीच उंची. आफ्रिकन लोकांसारखे केस आणि नेहमी ओठांना पांढरी झिंक क्रीम.‌ असा काहीसा लूक सायमंड्सचा असायचा. ग्राउंडवर उतरला की बॉलर्सची धुलाई सुरू करायची इतकेच त्याला माहीत होते. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज बनला असला तरी, त्याची लाईफ स्टोरी एखाद्या रोलर कॉस्टर राईडप्रमाणे होती.

सायमंड्सचा जन्मा इंग्लंडच्या बर्मिंघममधला. त्याच्या खऱ्या माता-पित्याबाबत तितकीशी माहिती नाही. त्याचे आई वडील वेस्ट इंडियन अन् डेन्मार्क तथा स्वीडिश असल्याचे सांगितले जाते. त्याच्या जन्माच्या तीन महिन्यात त्याचे पालक केन आणि बार्बरा त्याला घेऊन ऑस्ट्रेलियात आले. खेळ जणू काही त्याच्या रक्तात होता. तो क्रिकेट, रग्बी आणि टेबल टेनिस खेळायचा. रग्बी स्टार लेरॉय लॉगिनसारखा दिसतो म्हणून त्याचे कोच त्याला रॉय म्हणायचे.

हेही पाहा- धडाकेबाज क्रिकेटपटू तरीही दारूडा म्हणून ओळखला जाणारा ऍण्ड्रू सायमंड्स

हळुहळू रब्बी आणि टेबल टेनिस मागे सुटत गेले आणि सायमंड्स क्रिकेटर बनला. १९९४ अंडर ‌नाईन्टीन वर्ल्डकप तो ऑस्ट्रेलियासाठी खेळला. त्याच्या काही दिवसानंतरच ग्लॉस्टरशायर काउंटीसाठी खेळताना त्याने एकाच मॅचमध्ये २० सिक्स मारले. हा वर्ल्ड रेकॉर्ड बनला. या एका इनिंगने त्याला डायरेक्ट इंग्लंड ए टीममध्ये सिलेक्ट केले. तो जन्माने इंग्लिश असल्याने इंग्लंडसाठी खेळायला पात्र होता, पण सिलेक्शन झाल्याचे कळताच त्याने खेळायला नकार दिला. त्याचे म्हणणे होते त्याला ऑस्ट्रेलियासाठीच करिअर करायचेय.

पुढे १९९८ ला सायमंड्सने इंटरनॅशनल डेब्यू केला. पण चार वर्षात त्याला जास्त चान्सच भेटला नाही. २००२ ला क्रिकेट सोडून रब्बी खेळायचा निर्णय त्याने घेतला. पण पॉंटिंगने त्याला थांबवले. २००३ वर्ल्डकपला चान्स दिला आणि ऑस्ट्रेलियाचा आणखी एक लिजेंड घडला. पहिल्याच मॅचला पाकिस्तानचा घाम काढत तूफानी शतक. दुसऱ्या मॅचला इंडियाविरूद्ध बॉलिंगमध्ये योगदान आणि सेमी फायनलला मॅचविनिंग इनिंग‌ त्याने खेळली. त्यानंतर सायमंड्सचे नाव खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गाजू लागले.

सन २००५ नंतर सायमंड्सच्या करियरला घरघर लागली. त्याचा परफॉर्मन्स चांगला होता पण बाकीचे कांड तो करत राहिला. बांगलादेश टूरवर तो रात्रभर दारू पिला. दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिसमध्ये तो याच स्थितीत होता. आजवर ज्या ‌रिकी पॉंटिंगने त्याला पाठीशी घातले त्याच पॉंटिंगला त्याने उलट उत्तरे दिली. त्याला ताबडतोब ऑस्ट्रेलियाला पाठवून देण्यात आले.

या नंतरही सायमंड्समध्ये सुधारणा झाली नाही. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका टूरवर रग्बी खेळाडूशी भांडण झाले. २००७ वर्ल्डकप वेळी नाईट क्लबमध्ये राडा. आणि शेवटी कळस म्हणजे हरभजन सोबतचे मंकी गेट कांड. मंकी गेट प्रकरणानंतर त्याची दारूची सवय आणखीनच वाढली. त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनेकदा समजावले. कॉन्ट्रॅक्टमध्येच लिहून घेतले की ड्रेसिंग रूम आणि पब्लिक प्लेसमध्ये तो दारू पिणार नाही, पण सुधरेल तो सायमंड्स कसला? एक रग्बी मॅच पाहायला तो‌ नशेत गेला आणि त्याचे इंटरनॅशनल करिअर संपले. दोन-तीन वर्ष मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल खेळून त्याने क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने लहानपणी ठरवल्याप्रमाणे मासेमारी आणि शेती करू लागला. बाकी सारे दिग्गज कॉमेंट्री आणि कोचिंग म्हणून दुसरी इनिंग खेळत असताना सायमंड्स प्रसिद्धीपासून लांबच राहतोय.

सायमंड्स त्याच्या शॉट्सप्रमाणे त्याच्या दारू पिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवू शकला नाही. म्हणूनच त्याच्या धडाकेबाज करियरपेक्षा त्याच्या उचापतींच्या कथा जास्त आहेत. स्फोटक बॅटींग व उपयोगी बॉलिंगसोबत तो गन‌ फिल्डर होता, पण त्याच्या स्वत: च्या चुकांमुळेच आज लोक त्याला चांगल्या क्रिकेटरआधी दारुडा म्हणतात.

धडाकेबाज क्रिकेटपटू तरीही दारूडा म्हणून ओळखला जाणारा ऍण्ड्रू सायमंड्स | Andrew Symonds | Cricket

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल

धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?

चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---