Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ मराठमोळ्या व्यक्तीने भारतासाठी खेळलाय पहिला बॉल, 90टक्के लोकांना माहितीच नाही; तुम्ही घ्या जाणून

'या' मराठमोळ्या व्यक्तीने भारतासाठी खेळलाय पहिला बॉल, 90टक्के लोकांना माहितीच नाही; तुम्ही घ्या जाणून

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Janardan-Navle

जनार्दन ज्ञानोबा नवले. हे मराठमोळ नाव वाचून तुम्ही म्हणाल ही व्यक्ती नक्की कोण? आपल्या क्रिकेटच्या लेखामध्ये या व्यक्तीचा काय संबंध? हे असं म्हणण्याचं कारण हे की, जनार्दन नवले नावाची व्यक्ती भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली आहे हे 90 टक्के क्रिकेटप्रेमींना माहीतच नाही. तर हेच विस्मृतीत गेलेले जनार्दन नवले आजच्या आपल्या लेखाचा विषय आहेत.

नावावरूनच एक गोष्ट सिद्ध होते की, जनार्दन नवले (Janardan Navle) हे महाराष्ट्रीयन. त्यांचा जन्म आळंदी जवळच्या फुलगावचा. पूर्ण घर परंपरागत शेतकऱ्याचं. वडिलांनी कपड्यांचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला. त्याचवेळी जनार्दन यांना शाळेसाठी पुण्यात आणले. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथेच त्यांचं क्रिकेटवर प्रेम जडलं. क्रिकेट इतकं आवडू लागलं की, त्यांनी लवकरच शाळेला रामराम ठोकला. शिक्षण सोडून फक्त क्रिकेट आणि क्रिकेट खेळणे एवढाच त्यांचा ध्यास होता.

सुरुवातीच्या काळात चौरंगी मालिका व्हायच्या. त्यात हिंदू, मुस्लिम, पारशी आणि ब्रिटिश असे संघ खेळायचे. त्या हिंदूंच्या संघात वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांना संधी मिळाली. सेमी फायनलमध्ये मुस्लिम संघाविरुद्ध 74 आणि फायनलमध्ये पारशींविरुद्ध 96 रन्स करून त्यांनी दोन वर्षानंतर हिंदूंना मालिका जिंकून द्यायला मदत केली. 1926-1927ला जेव्हा आर्थर गिलियन एमसीसी टीम घेऊन इंडिया टूरवर आलेले, तेव्हा नवले खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरेत आले. विकेटकीपर आणि बॅटर अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी चोख पार पाडल्या. 1930 मध्ये त्यांनी सर्वांना आपल्या कामगिरीने खुश केलेले. चांगली बॅटिंग आणि सुपर क्विक कीपिंग यामुळे त्यांना देशातील सर्वोत्तम विकेटकीपर म्हणून गौरवल जाऊ लागले. टीम इंडिया पहिल्यांदा इंग्लंड टूरवर जाणार ही घोषणा झाली, तेव्हा विकेटकीपर म्हणून त्यांचं नाव घेतलं जाणार, हे माहीत होतं. मात्र, फक्त पूर्वपुण्याईच्या जोरावर तिथे जायला नको असं त्यांना वाटलं असणार. त्या टूरआधी ज्या ट्रायल मॅचेस झाल्या, त्यात 25 कॅच आणि 3 स्टंपिंगसह एक फिफ्टी मारून त्यांनी इंग्लंड टूरसाठी आपलं सीट एकदम पक्कं करून घेतलं.

लॉर्ड्सवर भारत पहिली टेस्ट खेळणार होता. मात्र, त्याआधी 21 टूर मॅचेस टीम इंडियाने खेळलेल्या. त्यात 600 रन्स करायला त्यांना यश आलं. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या विकेटकीपिंगची. द ग्रेट जॅक हॉब्स त्यांची तुलना थेट बर्ट ओल्डफील्ड आणि जॅक डकवर्थ या त्या वेळच्या सर्वोत्तम विकेटकीपर्ससोबत करतात. विस्डेनमध्ये लिहिलं गेलं, “जनार्दन नवले वरच्या दर्जाचे विकेटकीपिंग करायचे. त्यांनी जे जे केलं ते विजेच्या वेगासारखं होतं.” त्या जमान्यात इंग्लंडमधील सर्वात खडूस समीक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेव्हील कार्डस हे देखील स्वतःला जनार्दन नवले यांची स्तुती करण्यापासून रोखू शकले नव्हते. ‘पॉलिश्ड व क्विकसिल्वर’ असे शब्दप्रयोग त्यांनी जनार्दन नवलेंसाठी वापरले. एका भारतीय विकेटकीपरसाठी ही मोठी पावती होते.

भारताची पहिली टेस्ट सुरू झाली.‌ इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. फ्रँक वूली यांना पहिल्या इनिंगमध्ये रनआऊट करण्यात त्यांनी हातभार लावला. डग्लस जार्डीन यांचा कॅचही घेतला. त्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग आली. बॉलिंगला डेब्यूटंट बो आणि भारताकडून स्ट्राईकला जनार्दन नवले. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळण्याचे सौभाग्य जनार्दन नवले (Janardan Navle Played First Ball For India In Test Cricket) यांना लाभल. पहिल्या इनिंगमध्ये 12 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 13 रन्स त्यांनी केल्या. टीम इंडिया ती मॅच हरली पण जनार्दन नवले यांचे नाव इतिहासात नोंदवले गेले.

पुढच्या वर्षी ज्यावेळी भारतात मायदेशात पहिल्यांदा टेस्ट खेळला‌ तेव्हाही विकेटकिपिंगची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर राहिली. त्यानंतर मात्र त्यांना पुन्हा कधीच संधी मिळाली नाही. वय अवघं 31 पण त्या वेळच्या मानाने अधिक वय असल्याने त्यांच्या इंटरनॅशनल क्रिकेट करिअरला ब्रेक लागला. पुढे जॅक रायडर्सच्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्यांनी अनऑफिशियल टेस्टमध्ये भाग घेतला. आणि आणखी दोन रणजी मॅचेस खेळून त्यांनी क्रिकेट सोडलं. पुढे ग्वालियरमध्ये त्यांना नोकरी दिली गेली. मात्र, क्रिकेट सोडून त्यांचं मन लागलंच नाही. ती नोकरी सोडून ते पुण्यात आले. पुण्यातल्या एका शुगर मिलमध्ये वॉचमनची नोकरी त्यांनी पत्करली. काळानुसार, आपल्या क्रिकेट मित्रांशी त्यांचा संपर्क तुटला. हाताशी पैसे राहिले नाहीत. कमी शिक्षण आणि वयामुळे इतरही कामे होत नव्हती.

त्यांच्या शेवटच्या दिवसात अशी अफवा देखील उठली की, मुंबई-पुणे येथे ते भिक्षा मागत होते व त्यातच त्यांचे निधन झाले. मात्र, त्यानंतर खुलासा झाला की, त्यांच्या मुलाने शेवटच्या दिवसांमध्ये त्यांचा संपूर्ण सांभाळ केला आणि त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारही केले. परंतु, जनार्दन नवले हे नाव क्रिकेट विस्मृतीत गेले हेही खरे!

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची ‘मेडन ओव्हर मशीन’ बापू नाडकर्णी, सलग 21 ओव्हर टाकलेल्या निर्धाव; रंजक आहे प्रवास
जन्म अफगाणिस्तानचा, कुटुंब पाकिस्तानात वसलं, पण ‘ते’ भारतासाठी खेळले इंटरनॅशनल क्रिकेट, सिनेमातही आजमावला हात


Next Post
RCB-Team

आरसीबीची वाढली चिंता! घसघशीत बोली लावलेला अष्टपैलू आयपीएलच्या तोंडावर जखमी

Mohammad-Nissar

भारतीय बॉलिंगचा मूळपुरुष निसार! स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात जाऊन हलाखीत जगला

Eoin-Morgan-And-Alastair-Cook

जन्माने आयरिश असलेला पठ्ठ्या फक्त आईमुळे इंग्लंडकडून खेळू शकला, देशाच्याच भल्यासाठी सोडलं क्रिकेट

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143