आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील तिसरा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघातील चार खेळाडूंनी पदार्पण केले. मात्र, प्रत्येकाच्या नजरा बंगालसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या ईशान पोरेलवर होत्या. २३ वर्षीय पोरेल बंगालच्या अंडर १६, अंडर १९संघाकडून खेळला आणि नंतर २०१८ मध्ये अंडर १९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळवले. दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने बंगालच्या वरिष्ठ संघात स्थान पटकावले. परंतु,, कोलकाता जवळच्या चंदननगर ते आयपीएलपर्यंतचा प्रवास या गोलंदाजासाठी सोपा नव्हता. आपल्या जिद्दीच्या आणि उत्कटतेच्या जोरावर या गोलंदाजाने हे स्थान मिळवले.
फिटनेसने केले व्यंकटेश प्रसाद यांना प्रभावित
ईशानने वयाच्या १९ व्या वर्षी २०१७ मध्ये बंगालसाठी रणजी ट्रॉफी पदार्पण केले. विदर्भविरूद्ध झालेला सामना बंगालने १० गडी राखून सामना गमावला. पराभूत संघासाठी पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाची कामगिरी विसरणे सहसा सोपे असते. मात्र, भारताच्या कनिष्ठ संघाच्या निवड समितीचे सदस्य जे स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहत होते, ते ईशानची कामगिरी विसरले नाहीत.
त्यावेळी २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संघ निश्चित करण्याचे काम सुरू आहे. निवडकर्त्यांनी यापूर्वी पोरेलला गोलंदाजी करताना पाहिले होते. मात्र, त्याच्या फिटनेसशी संबंधित कारणांमुळे ते त्याला संघात स्थान देण्यास कचरत होते. कारण वयाच्या १९ व्या वर्षीच पोरेलला साईड स्ट्रेन, लिगामेंट इजा आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. परंतु, त्याच्या गोलंदाजीची नेहमीच चर्चा होत असत. म्हणूनच पहिल्याच दिवशी निवडकर्त्यांनी त्याला २२ षटके विना बळी घेत गोलंदाजी करताना पाहिले. दुसऱ्या दिवशीही त्याने दुपारच्या जेवणापासून चहाच्या ब्रेकपर्यंत गोलंदाजी सुरूच ठेवली.
पोरेलची गोलंदाजी पाहिल्यानंतर, कनिष्ठ निवड समितीचे प्रमुख व्यंकटेश प्रसाद म्हणाले की, तो खूप वेगवान आणि अचूक आहे. निर्जीव खेळपट्टीवरुनही त्याला अतिरिक्त बाउन्स मिळत आहे. ३५ अंश तापमान आणि आर्द्रतेमध्ये पोरेलने विदर्भाच्या पहिल्या डावात १३८ षटकांपैकी ४७ षटके गोलंदाजी केली फेकल्या. बंगालसाठी जवळपास एक तृतीयांश षटके या गोलंदाजाने केलेली. या सामन्यात त्याने १३९ धावा देऊन ४ बळी घेतले. कोणताही गोलंदाज यापेक्षा अधिक फिटनेसचा अधिक पुरावा देऊ शकत नाही. यानंतर पोरेलची १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आणि नंतर वर्ल्डकप संघात त्याला संधी मिळाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तो न्यूझीलंडमधून विश्वचषक विजेता खेळाडू म्हणून म्हणून परतला. निवड समितीला पोरेलची प्रतिभा विदर्भाविरुद्धच्या सामन्यात दिसली नसती तर, कदाचित त्याची कारकीर्द अशी झाली नसती.
प्रशिक्षकांच्या सल्ल्याने झाला गोलंदाज
पोरेल हा कोलकातापासून ५० किमी दूर असलेल्या चंदननगरचा रहिवासी आहे. त्याने क्लब क्रिकेटला त्याच शहरातून सुरुवात केली. २०१२ मध्ये तो पहिल्यांदा कोलकात्यात ट्रायलसाठी आला होता. इशान या ट्रायलमध्ये सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांच्यापासून प्रभावित होऊन फलंदाज बनण्यासाठी आला होता. मात्र, त्याची उंची पाहून शिबिराच्या प्रशिक्षकाने त्याला वेगवान गोलंदाज होण्याचा सल्ला दिला आणि येथूनच पोरेलची कारकीर्द बदलली.
कठोर मेहनतीने केले स्वतःला सिद्ध
पोरेल २०१४ मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याला कमी वजनाचा मानले गेले आणि त्याच्या गोलंदाजीची शैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. यानंतर, त्याने एक वर्ष स्व:ताच्या पद्धतीने फिटनेसवर काम केले. एसी जिमऐवजी, त्याने चंदननगरमधील त्याच्या घरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत धावण्यास सुरुवात केली. ३० मिनिटांचे हे अंतर पूर्ण करताना त्याच्या खांद्यावर एक किट बॅगही लटकलेली असायची. तो स्टेशनवरून हावडा ट्रेन पकडायचा आणि नंतर बसने सॉल्ट लेक किंवा ईडन गार्डन गाठायचा. संध्याकाळी घरी परतत असतानाही तो तोच दिनक्रम पाळायचा. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की या गोलंदाजाने मेहनतीच्या भट्टीत स्वतःला किती जाळले आहे. याचाच परिणाम म्हणून तो या भट्टीतून तावून सुलाखून निघत कुंदन बनला.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/pbks-vs-rr-live-rajasthan-royals-20-overs-all-out-185-runs/
अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर