वुमेन्स प्रीमियर लीग 2023 हंगामातील पहिल्या पाच सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाला पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेतील सहावा सामना युपी वॉरियर्झविरूद्ध आरसीबीने अखेर जिंकला आणि पराभवाचे सत्र थांबवले. संघाच्या स्पर्धेतील इतिहासातील या पहिल्या विजयाची शिल्पकार युवा भारतीय फलंदाज कनिका आहुजा ही ठरली. केवळ वीस वर्षांच्या असलेल्या कनिकाची आजवरची कारकीर्द कशी राहिली आहे हे आपण जाणून घेऊया.
सलग पाच सामने गमावल्यानंतर आरसीबीने सहावा सामना युपीविरुद्ध खेळला. गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत युपीला 135 पर्यंत थांबवले. विजयासाठी मिळालेल्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मंधाना, सोफी डिवाईन, हिदर नाईट व एलिस पेरी या संघाच्या चार प्रमुख फलंदाज 60 धावांवर माघारी परतल्या होत्या. त्या परिस्थितीतून कनिकाने अत्यंत आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूवर 8 चौकार व 1 षटकार मारत 46 धावांची खेळी केली. तिच्या याच खेळीमुळे संघाला विजय प्राप्त झाला. तसेच, सामनावीर पुरस्कार देखील तिने आपल्या नावे केला. विशेष म्हणजे ती या सामन्याआधी आजारी देखील होती.
कनिका ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करते. वुमेन्स प्रिमियर लीगसाठी खेळाडून चाललेला सुरू असताना तिच्यावर मुंबई इंडियन्स व आरसीबी बोली लावताना दिसलेले. अखेर 35 लाखांची रक्कम देत आरसीबीने तिला आपल्या ताफ्यात सामील केलेले. कनिकाने काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये खेळल्या गेलेल्या एका आंतरराज्य वनडे स्पर्धेत विक्रमी खेळी केली होती. 122 चेंडूवर 45 चौकार व 11 षटकारांच्या मदतीने 305 धावा चोपलेल्या.
आपल्या एका खेळीने चर्चेत आलेली कनिका अशाच प्रकारचे सातत्य कायम राखू शकल्यास, तिच्या स्वप्नपूर्ती पर्यंत म्हणजेच भारतीय संघापर्यंत पोहोचू शकते.
(Story Of Kanika Ahuja Who Heroic In RCB First Win In WPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीप्रेमींसाठी रैनाने दिली आनंदाची बातमी, आयपीएल 2024मध्येही खेळणार थाला?
’15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही…’, विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना