जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) मेगा लिलाव (Mega Auction) बेंगलोर येथे १२ व १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलावात अनेक युवा खेळाडूंना मोठ्या रकमा मिळाल्या. याच सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव गाजवलेल्या काही खेळाडूंना कोणी बोली लावली नाही. नेहमी युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने या लिलावात अनेक उत्कृष्ट खेळाडू विकत घेतले. त्यामध्ये मुळचा राजस्थानचा असलेल्या शुभम गढवाल (Shubham Garhwal) याचादेखील समावेश आहे. आज आपण या शुभम गढवालविषयी जाणून घेणार आहोत.
बेंगलोर येथे पार पडलेल्या या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुभम गढवाल याला त्याच्या २० लाख या मूळ किमतीत आपल्या संघात सामील करून घेतले. लांब षटकार मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शुभमची कहाणी मात्र काहीशी वेगळी आहे.
जोधपूरचा रहिवासी असलेला शुभम पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता. सोबतच तो क्रिकेट ही अत्यंत उत्कृष्ट खेळत. इंटर पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर तो इंजीनियरिंग करण्यासाठी दिल्लीला गेला. मात्र, २०१५ त्याचे प्रशिक्षक असलेले शाहरुख व प्रद्युत हे त्याला बळजबरीने शिक्षण सोडून जोधपुरला पुन्हा घेऊन आले व क्रिकेटचा सराव घेऊ लागले. या गोष्टीमुळे त्याचे वडील नाराज झाले होते. मात्र, दोन्ही प्रशिक्षकांनी त्याच्या वडिलांची समजूत काढली. तुमचा मुलगा सहजरीत्या षटकार मारतो. असे कसब सर्वांकडे नसते, असे त्यांनी सांगितले. शेवटी, किराणा दुकानदार असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेटर बनण्याची परवानगी दिली. तेव्हापासून तो रोज कठोर सराव करत इथपर्यंत पोहोचला आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात जयपूर येथे झालेल्या कॉल्विन शिल्ड स्पर्धेमध्ये त्याने अवघ्या १२ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून भारतीय दिग्गज युवराज सिंग याच्या पराक्रमाची बरोबरी केली होती. जोधपूरचा आणखी एक खेळाडू रवि बिश्नोई हादेखील यावर्षी आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग असेल.
महत्वाच्या बातम्या-
अनसोल्ड गेलेल्या अमित मिश्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघमालकाची भावूक पोस्ट; लिहीले… (mahasports.in)
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा (mahasports.in)