येत्या १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेच्या महिला विजेतेपदाची प्रमुख दावेदार सेरेना विलियम्सच आहे. असे मत अमेरिकेच्या माजी महान टेनिसपटू क्रिस एडवर्ट यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले आहे.
गेल्या वर्षी तीने मुलीला जन्म दिल्यानंतर ती शारीरिक रित्या पूर्णपणे स्वस्थ नाही. त्यामुळे गेल्या काही स्पर्धांमध्ये तीची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती.
नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंन्च ओपन स्पर्धेतही तिची कामगिरी चांगली झाली नव्हती.
“सेरेना विषयी बोलायचे झाले तर, ती क्ले कोर्टच्या तुलनेत ग्रास कोर्टवर चांगली खेळते. तीचे शॉटदेखील ग्रास कोर्टवर ताकदवान असतात.” असे ईएसपीएनवर सध्या समालोचन करत असलेल्या क्रिस एडवर्ट म्हणाल्या.
“सेरेनाने मातृत्त्वाचा आनंद घेतला आहे. आता ती कोर्टवर खेळण्यास पूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे तीला कोणीही गृहीत धरू शकत नाही. जर ती शारीरिक व मानसिक रित्या पूर्णपणे स्वस्थ असेल तर तीला कोणीही रोखू शकणार नाही.” असे तीनवेळच्या विंम्बलडन विजेत्या क्रिस एडवर्ट म्हणाल्या.
क्रिस एवर्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीत महिला एकेरीत १८ ग्रॅन्डस्लॅम विजेतेपदके मिळवली आहेत. यामध्ये तीन विंम्बलडन विजेतेपदांचा समावेश आहे.
तर महिली दुहेरीत तीन ग्रॅन्डस्लॅम विजेतेपदके मिळवली आहेत. यापैकी दोन विंम्बलडन विजेतेपदे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-








