फुटबॉल विश्वात गेल्या काही वर्षापासून ख्रिस्तियानो रोनाल्डो श्रेष्ठ की लिओनेल मेस्सी श्रेष्ठ हा वाद चाहत्यांमध्ये कायम सुरूच आहे.
रशियात होत असलेल्या 2018 फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या वादाने पुन्हा डोकेवर काढले आहे.
या विश्वचषकात रोनाल्डो आणि मेस्सीच्या कामगिरीवरुन चाहते एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत.
आता या रोनाल्डो-मेस्सी वादात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची एन्ट्री झाली आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड यांच्याबरोबरच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी युके दौऱ्यावर गेलेल्या विराट कोहलीने मेस्सीच्या वाढदिवशी रोनाल्डो सर्वकालिन महान फुटबॉलपटू असल्याचे कॅप्शन देत एक व्हीडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/BkaMurKgdVt/?utm_source=ig_embed
विराटने ख्रिस्तियानोला सर्वकालिन महान फुटबॉलपटू म्हणल्याचे काही मेस्सीच्या चाहत्यांना रुचले नाही.
मेस्सीच्या चाहत्यांनी मग विराटच्या या पोस्टवर अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया दिला.
सध्या रशियात सुरू असलेल्या फिफा विशवचषकात रोनाल्डो तुफान फॉर्ममध्ये आहे. तर लिओनेल मेस्सीची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे.
पोर्तूगालच्या रोनाल्डोने दोन सामन्यात चार गोल केले आहेत.
तर अर्जेंटीनाकडून मेस्सीला एकही गोल करता आला नाही. अर्जेंटीनाने खेळलेल्या आइसलँड विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला तर क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यात 3-0 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला आहे.
त्यामुळे रोनाल्डो-मेस्सी वाद चांगलाच वाढला आहे. त्यातच निराश झालेल्या मेस्सीच्या चाहत्यांनी विराटने शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याला चांगलेच धारेवर धरले.
महत्त्वाच्या बातम्या-
-त्यावेळी विराट घाबरला होता; सौरव गांगुलीचे कोहलीबद्दल मोठे वक्तव्य
-टॉप 5: हे भारतीय खेळाडू पहिल्यांदाच करत आहेत इंग्लंड दौरा