---Advertisement---

श्रीलंकेत असा पराक्रम करणारा केशव महाराज ठरला पहिला विदेशी गोलंदाज

On: शनिवार, जुलै 21, 2018 7:54 AM
---Advertisement---

कोलंबो | सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट मैदानावर शुक्रवारपासून (२० जुलै) श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

या सामन्यात दक्षिण अाफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महारजने श्रीलंकन भूमीवर अनोखा पराक्रम केला आहे.

केशव महाराजने या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचे ८ गडी बाद करत विक्रम केला. याबरोबरच श्रीलंकेत मुथय्या मुरलीधरन आणि रंगना हेराथ यांच्यानंतर कसोटी सामन्याच्या एका डावात ८ किंवा त्याच्यापेक्षा जास्त बळी मिळवणारा पहिला विदेशी गोलंदाज बनला आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने ८६ षटकात ९ बाद २७७ धावा केल्या होत्या.

यामध्ये बाद झालेल्या ९ फलंदाजांपैकी ८ फलंदाजांना केशव महाराजने बाद केले आहे. महाराजने ३२ षटकात ११६ धावा देत श्रीलंकेचे ८ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-अँजेलो मॅथ्यूजने कसोटी कारकिर्दीत गाठला मैलाचा दगड, अशी कामगिरी करणारा ९ वा श्रीलंकन फलंदाज

-जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना-सिंधु आपल्या स्थानी कायम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment