सचिन रमेश तेंडुलकर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू. ज्याच्या नावावर वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा पहिलाच खेळाडू. सचिनचा मैदानावरील आणि मैदानाबाहेरील स्वभाव सर्वांना माहित आहे. त्याला कधीही चिढताना किंवा कुणाला ताकिद देताना पाहिले नसेल, मात्र भारताचे एका सामन्यात नेतृत्व करताना एक वेगळेच चित्र दिसले.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) फलंदाज म्हणून उत्तमच मात्र त्याला भारताचे नेतृत्व नीट जमले नाही. नुकतेच त्याने एक खुलासा केला, ज्यामध्ये त्याने एका नवख्या खेळाडूला ‘पुन्हा असे केले तर थेट घरीच पाठवेल’, असे बजावले होते. हा प्रकार त्याने सांगितला आहे. ही घटना 1999च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडली.
“मी त्यावेळी संघाचा कर्णधार होतो आणि आम्ही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात होतो. एक नवखा खेळाडू ज्याचा कारकिर्दीतील पहिलाच दौरा होता, तो प्रेक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसला. जेथे एक धाव जायला पाहिजे होती तेथे त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे दोन धावा गेल्या. यामुळे मी त्याला जवळ बोलावले आणि खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटले जर तू पुन्हा असे केले, तर मी तुला घरी परत पाठणार. तू हॉटेलवर नाहीतर तर थेट भारतात जाणार, ” तेंडुलकरने हे इंफोसिसच्या एका कार्यक्रमात उलगडले.
“जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा एकही चूक केलेली चालणार नाही. देशासाठी खेळणे हा एक प्रकारचा सन्मानच असतो. तुमच्या जागेवर येण्यासाठी लाखो लोक धडपडत असतात,” असेही सचिनने पुढे म्हटले. त्यावेळी सचिन आणि त्या खेळाडूमध्ये नेमके काय संभाषण सुरू होते, हे कोणालाच कळाले नाही. तसेच सचिनने त्या खेळाडूचे नाव सांंगितले नाही.
सचिनने त्याच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळले. त्यातील 25 सामन्यांमध्ये त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळली. ज्यातील संघाने केवळ 4 सामने जिंकले, तर 9 सामने गमावले. त्याच्या नेतृत्वाखाली 12 कसोटी सामने अनिर्णीत राहिले. तसेच त्याने 1996-200च्या दरम्यान 73 वनडे सामन्यांचे नेतृत्व केले होते. ‘Straight home if you do it again’, Sachin Tendulkar warned the player while leading the team
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचे चालू सामन्यात लाजीरवाणे कृत्य, चारचौघात मागावी लागली माफी
इकडे टीम इंडियातून हाकालपट्टी, तिकडे पठ्ठ्याने रणजीत ठोकली ‘डबल सेंच्युरी’