बेंगलोर । येथील चिन्नस्वामी मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या वनडे सामना आज खेळला जात आहे. भारताने या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील दुसरा नाणेफेक जिंकला आहे तो ही एकदम वेगळ्या प्रकारे.
चिन्नस्वामीच्या मैदानावर नाणेफेकासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, त्यांच्याबरोबर समालोचक संजय मांजरेकर आणि सामना अधिकारी जेफ क्रो उभे होते. विराटने नाणे हवेत उडवले आणि स्मिथने हेड्स मागितले, विराटने उडवलेले नाणे बरोबर येऊन जमिनीवर बसले.
यावेळी हे नाणे जमिनीवर न घरंगळता सरळ हवेतून येऊन हेडच्या बाजूने स्थिरावले.
समालोचक मांजरेकर, स्मिथ आणि विराट सर्वच आश्चर्यने हसू लागले. समालोचक मांजरेकर म्हणाले “मी या आधी असा नाणेफेक कधीच बघितला नाही, नाणेफेक हवेत उडाल्यावर थेट येऊन खाली बसला.”
https://twitter.com/BCCI/status/913306608284790785