पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स संघाचा तर स्पीडिंग चिताज् संघाने बीआयपीएल रायझिंग इगल्स् संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स संघाने रेजिंग्ज् बुल्स संघाचा 46-39 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. विजयी संघाकडून सिया प्रसादे, सुर्या काकटे, अमोद सबनीस, मधुरीमा सावंत, अनर्घ गांगुली यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात अदिती लाखे , वैष्णवी अडकर , स्नेहा रानडे, यशराज दळवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर स्पीडिंग चिताज् संघाने रायझिंग इगल्स् संघाचा 40-34 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स वि.वि पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स 46-39
(एकेरी: 10वर्षाखालील मुली: सिया प्रसादे वि.वि प्रिषा शिरोळे 4-0, 10वर्षाखालील मुले: सुर्या काकटे वि.वि सनत काडले 4-1, 12 वर्षाखालील मुली: पुर्वा भुजबळ पराभूत वि चिन्मयी बागवे 3-6, 12 वर्षाखालील मुले: अमोद सबनीस वि.वि अभिराम निलाखे 6-3, 14 वर्षाखालील मुली: मधुरीमा सावंत वि.वि समिक्षा श्रॉफ 6-3, 14 वर्षाखालील मुले: अनर्घ गांगुली वि.वि अर्णव कोकणे 6-3, 16 वर्षाखालील मुली: मृण्मयी भागवत पराभूत वि हृदया शहा 4-6, 16वर्षाखालील मुले: इंद्रजीत बनसोडे पराभूत वि अर्जुन गोहड 2-6, मिश्र दुहेरी: आर्य जेकब/साईराज साळुंखे पराभूत वि कृष्णा शिंगाडे/रिजूल सिदनाळे 5-6, मिश्र दुहेरी: मृण्मयी भागवत/इंद्रजीत बनसोडे वि.वि हृदया शहा/सर्वेष बिरमाने 6-4)
स्पीडिंग चिताज् वि.वि बीआयपीएल रायझिंग इगल्स् 40-34
(एकेरी: 10वर्षाखालील मुली: देवांशी प्रभुदेसाई पराभूत वि वैष्णवी सिंग 0-4, 10वर्षाखालील मुले: आर्यन किर्तने पराभूत वि अभय नागराजन 1-4, 12वर्षाखालील मुली: अदिती लाखे वि.वि अलिना शेख 6-1, 12वर्षाखालील मुले: पार्थ देवरूखकर पराभूत वि अर्णव पापरकर 0-6, 14वर्षाखालील मुली: वैष्णवी अडकर वि.वि रिया वाशिमकर 6-2, 14वर्षाखालील मुले: जय पवार पराभूत वि निषित रहाणे 3-6, 16वर्षाखालील मुली: स्नेहा रानडे वि.वि मोहिनी घुले 6-3, 16वर्षाखालील मुले : यशराज दळवी वि.वि दक्ष अगरवाल 6-1, मिश्र दुहेरी: पियुष जाधव/ शर्वरी खवले वि.वि अर्णव बनसोडे/ गौतमी खैरे 6-2, मिश्र दुहेरी: वैष्णवी अडकर/प्रसाद इंगळे वि.वि मोहिनी घुले/दक्ष अगरवाल 6(7)-5)
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी गोलंदाजाला अतिउत्साह नडला सेलिब्रेशन करताना स्वतःलाच केले जखमी
या कृतीने क्रोएशियन राष्ट्राध्यक्षांनी जिंकली करोडो फुटबॉल रसिकांची मने