---Advertisement---

स्टुअर्ट बिन्नीच्या झंझावाती खेळीने पत्नी झाली इंप्रेस, मयंती लँगरने असा व्यक्त केला आनंद

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 3:03 PM
Stuart Binny and Mayanti Langer
---Advertisement---

कानपूर येथे झालेला रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पहिला सामना इंडिया लीजेंड्स संघाने गाजवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया लीजेंड्सने 20 षटकात 217 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात साउथ आफ्रिका लीजेंड्सला 20 षटकात 9 बाद 156 धावाच करता आल्या आणि त्यांनी 61 धावांनी हा सामना गमावला. भारतीय संघाच्या या विजयाचा शिल्पकार राहिला स्टुअर्ट बिन्नी. त्याच्या मॅच विनिंग प्रदर्शनाचे कौतुक त्याला सामनावीर पुरस्कार देत करण्यात आले. याबरोबरच त्याची पत्नी मयंती लँगर हिनेही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

दक्षिण आफ्रिका लीजेंड्सविरुद्ध (India Legends vs South Africa Legends) बिन्नीची (Stuart Binny) बॅट चांगलीच तळपली. 38 वर्षीय बिन्नीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत विस्फोटक खेळ दाखवला. वादळी खेळीनंतरही त्याचे शतक थोडक्यात हुकले. 195 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 42 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. त्याच्या या मोठ्या खेळीमुळेच इंडिया लीजेंड्स संघ 200 पेक्षा जास्त धावा फलकावर लावू शकला.

बिन्नीच्या या धमाकेदार खेळीनंतर त्याची पत्नी आणि स्पोर्ट्स एँकर मयंती लँगर (Mayanti Langer) हिच्या आनंदाला सीमा नव्हती. तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. मयंतीने बिन्नीचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जोडला आहे.

दरम्यान बिन्नीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त मोठी राहिली नाही. भारतीय संघाकडून 25 किंवा त्यापेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामने नशीबी आलेल्या दुर्देवी शिलेदारांपैकी तो एक आहे. त्याने 2014 ते 2016 दरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना एकूण 23 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये 14 वनडे, 6 कसोटी आणि 3 टी20 सामन्यांचा समावेश आहे.

14 वनडे सामने खेळताना त्याने 230 धावा आणि 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 6 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 194 धावा आणि 3 विकेट्सची कामगिरी केली आहे. याबरोबरच 3 टी20 सामन्यात त्यानला 35 धावा आणि 1 विकेट घेता आली आहे. त्याने  30 ऑगस्ट 2021ला क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

VIDEO: शेवटच्या सामन्यात अशा प्रकारे बाद झाला फिंच! अजूनही सामन्यात करू शकतो विशेष कामगिरी
‘पंत की कार्तिक’ टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळावे?
‘विराट हृदयाच्या जवळ आहे, पण…’ बाबर-कोहली वादावर पाकिस्तानी दिग्गजाने केली टिप्पणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---