भारताचा माजी अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो आता आपल्याला नव्या भूमिकेत दिसणार आहे. आसाम रणजी संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती झाली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
निवृत्तीनंतरच बिन्नीने प्रशिक्षणाची इच्छा व्यक्त केली होती. स्टुअर्ट बिन्नीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघासाठी ६ कसोटी, १४ एकदिवसीय आणि तीन टी -२० सामने खेळले होते. २०१६ पासून भारतीय संघात आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरल्यानंतर बिन्नीने क्रिकेटला अलविदा म्हटले होते.
स्टुअर्ट बिन्नीने आपल्या इन्स्टाग्रामवर विमान प्रवासातील स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि त्यात लिहिले आहे की, ‘आसाम रणजी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे.’
https://www.instagram.com/p/CT6r5proEjG/
भारताकडून वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अजूनही स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध फक्त ४ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. स्टुअर्ट बिन्नीने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये बिन्नीने २८.७५ च्या सरासरीने एकूण २३० धावा आणि २० विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, टी -२० मधील या अष्टपैलू खेळाडूची कामगिरी विशेष नव्हती आणि त्याने ३ सामन्यांमध्ये फक्त ३५ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, गोलंदाजीमध्येही फक्त एकच विकेट घेऊ शकला होता. बिन्नीने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. या प्रकारात त्याने १९४ धावा केल्या होत्या तसेच ३ बळी घेतले होते.
कर्नाटकच्या या माजी अष्टपैलूला आयपीएलमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. निवृत्तीची घोषणा करताना बिन्नी म्हटले होते की, ‘मी प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केल्याने मला खूप आनंद मिळाला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादसाठी करा किंवा मराची स्थिती, राशीद खान म्हणतोय, ‘पुन्हा एकत्र आलोय, आता प्रत्येक सामना…’
न्यूझीलंड संघ २८ वर्षांनंतर लखनऊला खेळणार कसोटी सामना, कारण आहे खास
टी२० विश्वचषकासाठी १५ जणांच्या मुख्य संघात स्थान न मिळाल्याने शार्दुल ठाकूर नाराज; म्हणाला…






