स्टुअर्ट ब्रॉड… हे नाव ऐकले तरी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर उभा राहतो युवराज सिंगने सहा षटकार मारल्यानंतर ढसाढसा रडलेला, इंग्लंडचा गोरापान, उंचपुरा 20-21वर्षाचा वेगवान गोलंदाज. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे नकोशी कामगिरी आपल्या विरुद्ध झाल्यावर एखादा गोलंदाज खचून गेला असता. मात्र, अंगात एका दर्जेदार क्रिकेटपटूच रक्त असलेला स्टुअर्ट आता क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या पंगतीत उभा राहिलाय. मागील दीड दशकाहून जास्त काळ इंग्लंड संघाचा आधारस्तंभ असलेला ब्रॉडी आज 37 व्या वर्षात पदार्पण करतोय.
ख्रिस ब्रॉड यांचा मुलगा अशी सुरुवातीला ओळख असलेला स्टुअर्ट वयाच्या विसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यात यशस्वी ठरला. सुरुवातीला वनडे व टी20 खेळाडू म्हणून त्याला ओळख मिळू लागली होती. मात्र, युवराजच्या सहा षटकारांमुळे अनेक दिवस तो चेष्टेचा विषय बनलेला. परंतु, फिनिक्स पक्षी राखेतून जशी भरारी घेतो अगदी तशीच भरारी या पठ्ठ्याने घेतली. कसोटी संघात संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करत तो इंग्लंडचा अव्वल गोलंदाज बनला. जेम्स अँडरसनसह त्याची जोडी अशी काही जमली की, इंग्लंडमध्ये आलेला इतर देशाचा कितीही मोठा फलंदाज यांच्यापुढे टिकाव धरू शकला नाही.
टी20 क्रिकेटला नऊ वर्षांपूर्वी आणि वनडे क्रिकेटला सात वर्षांपूर्वीच टाटा बाय बाय करत त्याने कसोटीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. आज त्याची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी पाहताना केवळ अनेकांना आश्चर्यच वाटेल. 163 कसोटी व 588 बळी हे दोन आकडेच त्याची महानता सिद्ध करतात. तो आणखी फार तर दोन-तीन वर्ष खेळू शकेल. मात्र, आपला सहकारी अँडरसन याच्यानंतर कसोटी क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वोत्तम बळी घेणारा गोलंदाज म्हणून त्याचे नाव नक्कीच अजरामर होईल.
(Stuart Broad Birthday Article He Celebrate His 37 Birthday)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा! दिग्गज क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टीम इंडियात दिसतोय भविष्यातील भारतीय संघ! पुढील 5 वर्षाची तयारीच सुरू