---Advertisement---

आले होते एका गोष्टीसाठी गाजले भलत्यासाठीच! डेविड वॉर्नर-स्टुअर्ट ब्रॉडच्या बाबतीत घडला भन्नाट योगायोग

On: सोमवार, डिसेंबर 26, 2022 1:54 PM
Stuart Broad & David Warner
---Advertisement---

आजच्या घडीला क्रिकेटविश्वात असे मोजकेच खेळाडू आहेत, जे क्रिकेटच्या छोट्या प्रकाराबरोबर दीर्घकाळ चालणारा फॉरमॅट कसोटीमध्येही खेळतात. काहीजण तर असे आहेत ज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवातच टी20 पासून केली आणि पुढे 100 कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याच्या कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना ठरला.

डेविड वॉर्नर (David Warner) याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिला सामना 2009मध्ये खेळला होता. त्या टी20 सामन्यात वॉर्नरने सलामीला येताना 89 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे तो टी20 सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला होता आणि आता तो कारकिर्दीतील 100वा कसोटी सामनाही मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळत आहे.

वॉर्नरने आतापर्यंत 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 32.88च्या सरासरीने 2894 धावा केल्या आहेत. कसोटीमधील त्याची सरासरी पाहिली तर ती 45च्या आसपास आहे.

वॉर्नरशिवाय एक असा खेळाडू आहे, ज्यानेही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरूवात टी20ने केली आणि आता तो 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने 2006मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या त्या टी20 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले.

ब्रॉड इंग्लंडच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य राहिला आहे, मात्र मर्यादीत षटकांच्या सामन्यात तो मागे आहे. त्याने इंग्लंडकडून शेवटचा टी20 सामना 2014मध्ये आणि वनडे सामना 2016मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 65 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये तो उत्तम असून त्याने आतापर्यंत 159 सामन्यांमध्ये 566 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये त्याची इकॉनॉमी 2.94 एवढी असून टी20मध्ये 7च्या पुढे आहे.

वॉर्नर-ब्रॉड यांनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले मात्र या प्रकाराचे 100 सामने खेळण्याआधीच कसोटीमध्ये 100 सामन्यांचा आकडा गाठला. ब्रॉड आता कसोटीमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. वॉर्नरही कसोटीमध्ये वनडे आणि टी20च्या तुलनेत सर्वोत्तम ठरत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला काय म्हणावं आता! जेव्हा पाकिस्तानचा चिफ सिलेक्टरच करतो बॉल टेंपरिंग, संघ सहकाऱ्याने खोलले राज
ठरलं तर, श्रीलंकेविरुद्ध भारताचे कर्णधारपद हार्दिककडेच! व्हिडिओ आला समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---