---Advertisement---

स्टुअर्ट ब्रॉडच्या होणाऱ्या नवरीची मोठी इच्छा; म्हणे, ‘मोठं कुटुंब पाहिजे, मुलं घरभर फिरतील’

---Advertisement---

इंग्लंड संघाचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने यावर्षाच्या सुरुवातीला गायिका मोली किंग हिच्यासोबत साखरपुडा केला होता. लवकरच लग्नबंधनात अडकणारी ही जोडी त्यांच्या संसाराच्या योजनेत रमली आहे. स्टुअर्टची होणारी पत्नी मोली हिने तिला स्टुअर्टसोबत एक मोठा परिवार बनवायचा असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. ति ब्रिटिश वेबसाईट ‘फिमेल फर्स्ट’ दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.

स्टुअर्ट आणि मोली 2012 पासून एकमेकांना डेट करत होते. परंतु त्यानंतर 2018 साली काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मात्र पुन्हा ते एकत्र आले आणि जानेवारी 2021 मध्ये त्यांनी साखरपुडा केला.

स्टुअर्टने त्यांच्या साखरपुड्याला ‘2021 ची अतिशय उत्तम सुरुवात’ असे म्हटले होते.

https://www.instagram.com/p/CJgxfg9sjXj/?utm_source=ig_web_button_share_sheet

तर मोलीने आपल्या पोस्टमध्ये ‘नवीन वर्षाचे सर्वात करिष्माई सुरुवात’ असे म्हटले होते.

https://www.instagram.com/p/CJgxCzFgb3f/?utm_source=ig_web_button_share_sheet

34 वर्षीय स्टूअर्ड सोबतच्या भेटीला मोलीने आपल्या आयुष्यातला सुंदर क्षण म्हणून सांगितले आणि ती नशीबवान आहे की, तिला या स्टार खेळाडूवर प्रेम झाले. मोलीने ‘फिमेल फर्स्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “नक्कीच मला माझे एक आनंदी कुटुंब बनवायचे आहे. या सर्व गोष्टी मला नेहमी हव्या होत्या आणि मला खरोखर एक मोठे परिवार पाहिजे. ही अशी गोष्ट आहे, जी भविष्यात मला खूप आवडेल. माझे सर्वात मोठे स्वप्न प्रेमात पडणे हे होते. मी खूप नशीबवान आहे, की मी स्टुअर्टला भेटले. आशा आहे की, काही दिवसातच आमची लहान-लहान मुले इकडे तिकडे खेळतील.”

यापुर्वी मोली किंगने तिचे दुःखही व्यक्त केले. ती म्हणाली की, “स्टुअर्टची राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर तो माझ्यापासून सतत दूर राहत असायचा. त्याच्यासोबत कमी वेळ घालवूनही आमचे नाते उत्तम आहे. मी त्याला पाहण्यासाठी आतुर असते. कारण तो जास्त वेळ आपल्या संघातसोबतच असतो. कधी-कधी असे वाटते की, तो आमच्या नात्यासाठीच काम करत आहे. मला त्याची खूप आठवण येते. आम्ही दरवेळी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि भेटण्यासाठी वाट बघत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

जडेजामुळे माझं स्थान धोक्यात; ३ कसोटीत २७ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजाचा आरोप

‘धोनी फॅमिली’च्या घरात नवीन पाहुणा, पती-पत्नी संगतीनं घेत आहेत खूप काळजी

तब्बल १०९ वर्षापासून ‘या’ गोलंदाजाचा विक्रम आहे अबाधित; एका दिवसात घेतलेल्या दोन हॅट्रिक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---