१ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित कसोटी मालिकेला सुरवात होत आहे.
या कसोटी मालिकेत सर्वांचे लक्ष भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने मालिकेपूर्वी विराट कोहलीला निष्प्रभ ठरवण्यासाठी मोठी योजना आखल्याचा खुलासा केला आहे.
“मी विराटला बाद करण्यासाठी २०१४ सालच्या कसोटी मालिकेतील व्हीडीओंचा अभ्यास करत आहे. विराटला गोलंदाजी करताना मी त्याच्या पॅड्सवर गोलंदाजी करणे टाळणार आहे. कारण विराट पॅडवरचे चेंडू खेळण्यात पटाईत आहे.” असे इंग्लिश गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला.
“विराटने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत दमदार कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंड विरुद्धही भारतात खुप धावा केल्या आहेत. त्याला सुरुवातीलाच बाद करणे आमचे लक्ष असेल. जर विराटला चांगली सुरवात मिळाली तर त्याला रोखणे कठीण असते.”
२०१४ साली विराट प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. यामधील ५ कसोटी सामन्यांच्या १० डावात विराटला फक्त १३४ धावा करता आल्या होत्या.त्यामुळे विराटही या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-वनडेत द्विशतक करणारा हा ठरला पहिलाच पाकिस्तानी फलंदाज
-रशिद खान म्हणतो, कृणाल आपणही हे करायला हवे