ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिका नेहमीच चर्चेत असते. मागच्या वर्षी ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलल्या या मालिकेत पाहुण्या इंग्लंड संघाने अक्षरशः गुडघे टेकले होते. उभय संघांतील आगामी ऍशेस मालिका जून महिन्यात सुरू होणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने मागच्या वर्षीची मिळालेल्या पराभवाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) इंग्लंड संघातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. आगामी ऍशेस मालिकेत (Ashes 2023) देखील ब्रॉडची भूमिका संघासाठी महत्वाची राहणार आहे. 16 जून रोजी इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात ऍशेस 2023चा पहिला सामना सुरू होईल. पण त्याआधीच इंग्लंडच्या या दिग्गज वेगवान गोलंदाजाने मागच्या ऍशेसमधील पराभवाचे कारण सांगितले आहे. ब्रॉडच्या मते कोरोना प्रतबंधांमुळे संघाला मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला, ज्याचा परिणाम संघाच्या प्रदर्शनावर देखील झाला.
ऍशेस 2021-22मधील पराभवावर काय म्हणाला स्टुअर्ट ब्रॉड?
ब्रॉडने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले की, “कोरोना प्रतिबंधांमुळे त्या मालिकेत चांगले प्रदर्शन झाले नाही. प्रशिक्षण, प्रवास आणि इतरांसमोबत सामील होण्याची संधी मिळाली नाही. मागची ऍशेस मालिका माझ्या दृष्टीने निरर्थक होती. मागच्या ऍशेसपेक्षा कठीण काहीच नव्हते. मला वाटते ऍशेस मालिका असी नसतेच. ऍशेस म्हणजे उच्च पातळीचा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू आपले सर्वोत्तम प्रदर्शन देतात.”
दरम्यान, आगामी ऍशेस मालिकेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. 7 ते 11 जून दरम्यान हा सामना खेळला जाईल आणि त्यानंतर 16 तारखेपासून ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये ऍशेस मालिकेची सुरुवात करायची आहे. मालिकेतील पहिला सामना 16 ते 20 जूनदरम्यान बर्मिंघममध्ये खेळला जाणार आहे. दुसरा सामना 28 जून ते 2 जुलैदरम्यान ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. मालिकेतील तिसरा सामना 6 ते 10 जुलै रोजी लीड्स स्टेडियमवर पार पडले. चौथा सामना 19 ते 23 जुलैदरम्यान मॅनचेस्टरमध्ये, तर मालिकेतीस शेवटचा सामना 27 ते 31 जुलैदरम्यान द ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन ही वेगवान गोलंदाजांची जोडी मायदेशातील ऍशेस मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करू शकते. ऑस्ट्रेलियन संघासमोर ब्रॉड आणि अँडरसन जोडीने आव्हान सर्वात मोठे असेल. (Stuart Broad’s big statement about the Ashes series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसी फायनलसाठी गावसकरांनी निवडली भारताचा प्लेइंग इलेव्हन! 5 फलंदाज आणि 3 गोलंदाजांना संधी
नाद करायचा नाय! सिराजच्या वेगापुढे रसेलने टेकले गुडघे, यॉर्कर चेंडू टाकत उडवल्या दांड्या, Video