इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित चार कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. ब्रॉडची दुखापत हा इंग्लंड संघासाठी मोठा धक्का आहे. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या इंग्लंड संघाचे गोलंदाजी आक्रमण या वेगवान गोलंदाजीच्या कमतरतेमुळे थोडे कमकुवत झाले म्हणावे लागेल. आता ब्रॉडने आपल्या अनुपस्थितीवर निराशा व्यक्त केली आहे.
नडगीला झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यामुळे निराश झालेल्या ब्रॉडने म्हटले आहे की, तो दुखापतीतून सावरण्यावर भर देईल आणि डिसेंबरमध्ये एशेज सिरीजची तयारी करेल. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाला मंगळवारी (१० ऑगस्ट) सराव करताना उजव्या नडगीला दुखापत झाली होती. ब्रॉडचे एमआरआय स्कॅन बुधवारी लंडनमध्ये करण्यात आले, ज्यामुळे दुखापतीची पुष्टी झाली. यानंतर तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडल्याचे घोषित करण्यात आले.
कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर स्टुअर्ड ब्रॉडचे हृदय तुटले
स्टुअर्ट ब्रॉडने इन्स्टाग्रामवर लिहिले, “गोष्टी किती वेगाने बदलू शकतात. प्रशिक्षणापूर्वी आनंद वाटत होता आणि नंतर सराव करतानाही मी एका अडथळ्यावर उडी मारली. माझ्या उजव्या घोट्यावर चुकीच्या मार्गाने उतरलो आणि नंतर पुढच्या पायरीवर असे वाटले की, कोणीतरी माझ्या पायाच्या मागच्या बाजूस खूप जोरात मारले आहे. मी मग जेम्स अँडरसनकडे वळून विचारले की, त्याने मला का मारले. पण जेव्हा मला कळाले की, तो माझ्या आजूबाजूलाही नाही. तेव्हा मला समजले की, मी संकटात आहे.”
https://www.instagram.com/p/CScMIvBsxYN/?utm_source=ig_web_button_share_sheet
भावनिक पोस्ट शेअर केली
ब्रॉड म्हणाला, “पुढे स्कॅनमध्ये माहीत झालं की, नडगीला ग्रेड तीनची इजा झाली आहे. मी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्याने निराश आहे. पण, आता लक्ष ऑस्ट्रेलियावर आहे. मी पूर्ण वेळ घेईन, कोणतीही घाई करणार नाही. हळूहळू पुढे जाईल आणि तिथे जाण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करेल. माझे लक्ष आता यावरच आहे.” ब्रॉडला गेल्या आठवड्यात पावसामुळे ड्रॉ झालेल्या पहिल्या कसोटीत फक्त एक विकेट घेता आली होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी अनिर्णित राहिली, दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मार्क वूडच्या वेगवान चेंडूने रिषभ पंतला दाखवला पव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ
भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे वनडे क्रिकेटमध्ये इतिहास
बापरे! एकाच सामन्यात ११ पैकी ७ डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून