---Advertisement---

ENGvIND, 3rd Test, 2nd Day Live: जो रूटचे झंझावती शतक, दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंड ३४५ धावांनी आघाडीवर; अजून २ गडी बिनबाद

---Advertisement---

हेडिंग्ले| इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही सामन्यावर यजमानांचे वर्चस्व पाहायला मिळाले. अखेर दुसऱ्या दिवसाखेर फलंदाजांच्या धुव्वादार खेळींमुळे इंग्लंडने ३४५ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

सलामीनीर हसीब हमीद (६८ धावा) आणि रॉरी बर्न्स (६१ धावा) यांच्या अर्धशतकी भागिदारीमुळे संघाला भक्कम सुरुवात मिळाली. मोहम्मद शमीने बर्न्सला त्रिफळाचीत करत १३५ धावांवर त्यांची भागिदारी मोडली. पुढे संघाच्या १५९ धावांवर हमीदही रविंद्र जडेजाचा शिकार बनला. पुढे ३ वर्षांनंतर कसोटीमध्ये पुनरागमन करत असलेल्य डेविड मलानने ७० धावांची प्रशंसनीय खेळी केली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून तो झेलबाद झाला.

पुढे एका बाजूने विकेट जात असताना कर्णधार जो रूटने १६५ चेंडूंमध्ये १२१ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १४ धावा केल्या. त्यानंतर शमी, सिराज अन् जडेजाने खालच्या फळीतील फलंदाजांना जास्त धावा करु दिल्या नाहीत. अखेर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताला ४२३ धावांवर इंग्लंडच्या ८ विकेट्स घेतला आल्या. त्यांचे खालच्या फळीतील फलंदाज क्रेग ओव्हरटन (नाबाद २४ धावा) आणि ऑली रॉबिन्सन (० धावा) अजूनही बिनबाद आहेत.

जो रूटचे तूफानी शतक

सलामी जोडीच्या विकेटनंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने संघाचा धावफलक पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. आधी डेविड मलान नंतर जॉनी बेयरस्टोसह अप्रतिम भागिदारी करत १०४ व्या षटकापर्यंत त्याने शतकाला गवसणी घातली.

इशांत शर्माच्या डावातील १०४ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूंवर खणखणीत चौकार खेचत त्याने शतक पूर्ण केले. १२४ चेंडूंचा सामना करताना त्याने ही धावसंख्या केली आहे. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील २३ वे शतक ठरले आहे. तसेच या कसोटी मालिकेतील सलग तिसरे शतक आहे.

त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३ बाद ३३३ धावा फलकावर नोंदवल्या आहेत. सोबतच २५५ धावांची आघाडीही घेतली आहे.

चहापानाच्या ब्रेकपर्यंत इंग्लंडने २२० धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने डेविड मलानच्या रुपात इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे.

९३.६ षटकांत सिराजच्या चेंडूवर यष्टीरक्षक रिषभ पंतने मलानचा अप्रतिम झेल टिपला. यासह १२८ चेंडूंमध्ये ११ चौकारांच्या मदतीने ७० धावा करत मलानच्या खेळीवर अंकुश लागला. यासह चहापानाच्या ब्रेकपर्यंत इंग्लंडने ९४ षटके खेळताना ३ विकेट्सच्या नुकसानावर २९८ धावा फलकावर लावल्या आहेत. याबरोबरच संघाने २२० धावांची आगाडीही घेतली आहे.

इंग्लंडने ओलांडला २०० धावांचा आकडा

१२० धावांपासून पुढे दुसऱ्या दिवसाच्या खेळास सुरुवात करत इंग्लंडने दुसऱ्या सत्रापर्यंत २०० धावा फलकावर नोंदवल्या. लंच ब्रेकनंतर कर्णधार जो रूट आणि डेविड मलान यांनी धावफलक हालता ठेवला. ७३.१ षटकात दमदार चौकार खेचत रूटने संघाची धावसंख्या २०० पार नेली.

इंग्लंडच्या २०० धावा झाल्या तेव्हा रूट ३३ धावा आणि मलान २८ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी इंग्लंडने रॉरी बर्न्स आणि हसीब हमीदच्या रुपात २ विकेट गमावल्या आहेत.

रविंद्र जडेजाची पहिली विकेट

४२ षटके अन् १२० धावांपासून पुढे खेळताना रॉरी बर्न्सच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. मोहम्मद शमीने त्याला त्रिफळचीत केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचे आपले पहिलेच षटक टाकण्यासाठी आलेल्या रविंद्र जडेजाने ६२.६ षटकात सलामीवीर हसीब हमीदला त्रिफळाचीत केले. यासह १५९ धावांवर भारताला दुसरी विकेट मिळाली.

हमीदने पहिल्या दिवशीपासून मैदानावर तळ ठोकून अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढेही हीच लय कायम राखत संघाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. अखेर दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात जडेजाला त्याला ६८ धावांवर पव्हेलियनला पाठवले. हमीदच्या विकेटनंतर इंग्लंडचा संघ ८१ धावांच्या आघाडीवर आहे.

सलामीवीर रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद यांच्या फटकेबाजीनंतर अखेर ५० व्या षटकात भारतीय संघाला पहिले यश मिळाले आहे. मोहम्मद शमीने ५० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बर्न्सला ६१ धावांवर त्रिफळाचीत केले आहे. यासह इंग्लंड संघ १ बाद १३५ धावांवर आहे.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---