इंग्लंडमध्ये सध्या प्रतिष्ठेची काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहे. काऊंटी स्पर्धेमध्ये क्रिकेटरसिकांना नेहमीच उत्तम क्रिकेट बघायला मिळत असते. ही स्पर्धा नेहमीच कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे कायम चर्चेत असते. आतासुद्धा काहीसा असाच प्रकार घडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉटिंघमशायर विरुद्ध डर्बीशायर संघांमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकन खेळाडू डेन पीटरसनने एक अविश्वसनीय झेल टिपला. या झेलमुळे पीटरसन संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
डर्बीशायर संघाकडून सॅमुअल कॉर्नरस हा खेळाडू फलंदाजी करत होता. यावेळी गोलंदाजाने टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर त्याने शानदार फटका मारला. सर्व खेळाडूंना वाटले की चेंडू थेट सीमापार जाईल, मात्र अशातच पीटरसनने सीमारेषेजवळ हवेत उडी घेत एका हाताने अविश्वसनीय झेल पकडला.
पीटरसनने हा झेल पकडल्यानंतर मैदानात मोठ्याप्रमाणात जल्लोष केला. काही कालावधीतच हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून पीटरसनचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
???? Simply stunning.@DanePaterson44 #GreatDane #DervNotts pic.twitter.com/js3FbGgfu0
— Nottinghamshire CCC (@TrentBridge) May 4, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता नॉटिंघमशायरने येथे सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या नॉटिंघमशायरने आपल्या पहिल्या डावात 264 धावा केल्या. प्रत्युत्तरात डर्बीशायरचा पहिला डाव केवळ 105 धावांवर आटोपला. नॉटिंघमशायरने आपल्या दुसऱ्या डावात 318 धावा करत डर्बीशायरचा दुसरा डावही केवळ 159 धावांवर रोखला व 310 धावांनी एक मोठा विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
डॅडी तुम्ही थेट घरी या! डेव्हिड वॉर्नरच्या लाडक्या लेकीने वडीलांसाठी लिहिले भावनिक पत्र
आयपीएल २०२१ स्थगित होताच सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट; आरसीबी झाली सर्वाधिक ट्रोल




