---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत चर्चा होणार तर ती फक्त याच खेळाडूची

---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यातील मर्यादीत षटकांचं क्रिकेट आता संपलं असून लवकरच कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. एक सराव सामना व दोन कसोटी सामने असे याचे स्वरुप असणार आहे. या दौऱ्यासाठी जेव्हा संघ जाहीर करण्यात आला तेव्हा कसोटी संघात युवा प्रतिभावान खेळाडू शुबमन गिलचा समावेश करण्यात आला आहे.

शुबमन सध्या न्यूझीलंडमध्येच असून इंडिया अ कडून जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने इंडिया अ कडून न्यूझीलंड११ संघाविरुद्ध ५०, २४ व ३० अशा खेळी केल्या तर दोन प्रथम श्रेणी सामन्यात इंडिया अ कडून खेळतानाच न्यूझीलंड११ संघाविरुद्ध ८३, नाबाद २०४ व १३६ धावा केल्या आहेत.

तो १७ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये सामने खेळत असून गेल्या १ महिन्यात त्याने वातावरणाशी चांगलेच जुळवून घेतले आहे. त्याला आता संघात संधी मिळते की नाही हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शुबमनने २१ प्रथम श्रेणी सामन्यांत ७३.५५च्या सरासरीने २१३३ धावा केल्या आहेत. यात ७ शतके व १० अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याने वनडेद्वारे ३१ जानेवारी २०१९ रोजी हॅमिल्टन येथेच न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---