इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ हंगामाचा विजेता संघ गुजरात टायटन्सच्या विजयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयपीएलमध्ये पदार्पणातच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली या संघाने मिळवलेल्या यशाने त्यांचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.
गुजरातचा या आयपीएलमधील प्रवास हा एका चित्रपटाप्रमाणे वाटतो. सुरूवातीला त्यांचा संघ कमकुवत वाटत होता. तो विजेतेपदाचा दावेदार असेल असे कोणालाच वाटले नव्हते, तर शेवटच्या सामन्यातील त्यांचा विजय आधीच निश्चित केला, असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी म्हटले आहे.
“इंटेलिजेंस एजन्सीच्या मतानुसार, आयपीएलच्या सामन्यांतील निकालाबाबत गडबड झाली आहे. त्यासाठी एक समिती नेमावी, पण हे होणार नाही कारण अमित शहा यांचा मुलगाच बीसीसीआयचा सभासद आहे” असे ट्विट करत स्वामी यांंनी आयपीएलच्या निकालाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
There is widespread feeling in intelligence agencies that the Tata IPL Cricket outcomes were rigged. It may require a probe to clear the air for which PIL may be necessary since Govt will not do it as Amit Shah’s son is defacto dictator of BCCI
— Subramanian Swamy (@Swamy39) June 2, 2022
अंतिम सामन्यात हार्दिकने अष्टपैलू खेळी केली होती. त्याने ३४ धावा करत ३ विकेट्सही पटकावल्या होत्या. पंधराव्या आयपीएल हंगामाच्या अंतिम सामन्यात गुजरातने घरच्याच मैदानावर राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव केला होता. त्यांनी साखळी सामन्यांत १४ पैकी १० सामने जिंकत प्लेऑफची फेरी गाठली होती, तर पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थानला ७ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘…तरीही कोहली फेल असल्यासारखे वाटते’, भारताच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान
‘तुमच्या प्रामाणिकपणावरच प्रश्न उपस्थित केल्यावर दु:ख होते’, संघाची साथ सोडल्यानंतर हळहळला साहा