आयपीएल २०२१ च्या लिलावात खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली होती. अशातच काही खेळाडू असेही होते ज्यांच्यावर १४ कोटींपेक्षा जास्तीची बोली लावण्यात आली. यात ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, कायल जेमिसन आणि ख्रिस मॉरिस यांचा समावेश होतो. तसेच यंदाच्या लिलावात मोठ्या बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीत, भारतीय संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. हे खेळाडू आयपीएल लिलावामुळे रातोरात कोट्याधीश बनले आहेत. त्याच काही निवडक खेळाडूंचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
चला तर मंडळी, जाणून घेऊया त्या नवख्या खेळाडूंचा प्रवास..
एकेकाळी घरात टिव्ही देखील नसणारा चेतन सकारिया
सौराष्ट्र संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या चेतन सकारिया याला राजस्थान रॉयल्स संघाने १.२० कोटींची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. मागच्या वर्षापर्यंत त्याच्या घरी टिव्ही देखील नव्हता. क्रिकेट सामने पाहण्यासाठी तो आपल्या मित्रांच्या घरी जात असे. त्याचे वडील कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी टेम्पो चालवत असत.
कुच बिहार ट्रॉफीमध्ये खेळत असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मैक्ग्रा यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. आता राजस्थानने येत्या हंगामात त्याला अंतिम एकादशमध्ये खेळण्याची संधी दिली तर तो नक्कीच आपल्या प्रतिभेची छाप पाडण्याचा प्रयत्न करेल.
शाहरुख खान ठरला ५ कोटींचा मानकरी
सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाहरुख खान याला पंजाब किंग्स संघाने ५.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर तामिळनाडू संघाला अंतिम फेरीत विजय मिळवून दिल्या. त्याने बडोदाविरुध्द झालेल्या सामन्यात शेवटी येऊन ७ चेंडूत १८ धावा ठोकल्या होत्या.
मागीलवर्षी अनसोल्ड राहिलेल्या शाहरुखच्या घरची परिस्थिती जास्त चांगली नाही. पंरतु आयपीएल लिलावामुळे तो एका रात्रीत कोटींचा धनी ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट मॉरिसवर लागलेल्या १६.२५ कोटींच्या ऐतिहासिक बोलीची