भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्व खऱ्या अर्थाने पुढे आले ते दक्षिण आफ्रिका दौऱ्यात. कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराटने कर्णधार तसेच एक खेळाडू म्हणून वनडेत जोरदार पुनरागमन केले.
यामुळे विराटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात माजी खेळाडू आणि कर्णधार सौरव गांगुलीचाही समावेश आहे.
आज जेव्हा NDTV Sports बोलताना गांगुलीला प्रश्न विचारण्यात आला की ‘आजच्या संघात जी आक्रमकता आहे ती तूझ्यामुळे आली आहे काय़’ तेव्हा गांगुलीने ही आक्रमकता माझ्याही पूढे असल्याचे हसत-हसत उत्तर दिले.
“मी जेव्हा विराटला पुढच्या वेळी भेटेल मी तेव्हा त्याला विचारणार आहे की तू कूणाला प्रत्येक चेंडूवर आक्रमकता दाखवतो? ड्रेसिंग रुममधील तु नक्की कुणाला तुझ्या हावभावांनी लक्ष करत असतो?” असे गांगुली गमतीने म्हणाला.
“विराट हा एक जबरदस्त खेळाडू आहे. त्याने आफ्रिकेत ज्याप्रकारे फलंदाजी केली ती अफलातून होती.” असेही गांगूली पूढे म्हणाला.