---Advertisement---

सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये केली विक्रमी मेडलची कामगिरी, भारताला जिंकून दिले कॉमनवेल्थ गेम्सचे सहावे गोल्ड

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 12:03 PM
Sudhir
---Advertisement---

बर्मिंघम। कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकत मोठा पराक्रम केला आहे. तसेच भारताचे आतापर्यंत या २२व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या (India in Commonwealth Games) हंगामातील सहावे सुवर्ण पदक ठरले आहे. सुधीरने पुरूषांच्या  पॉवरलिफ्टिंगमध्ये २१२ किलोग्राम वजन उचलत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. भारताचे हे या क्रिडाप्रकारातील पहिलेच सुवर्ण पदक आहे.

सुधीरने रचला इतिहास

सुधीर (Sudhir) पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावणारा पहिलाच भारतीय ऍथलेटिक्स ठरला आहे. एशियान पॅरा गेम्स कांस्य पदक विजेत्या सुधीरने या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात २०८ किलोग्राम वजन उचलले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात त्याच्यात वाढ करत २१२ किलो वजन उचलले आणि १३४.५ गुण कमावले. तसेच त्याने या स्पर्धेचा विक्रमही मोडीत काढला आहे. त्याचबरोबर त्याने सुवर्ण पदक पक्के केले. मात्र तो शेवटच्या प्रयत्नात २१७ किलो वजन उचलण्यास अपयशी ठरला.

या क्रिडाप्रकारात नायजेरियाच्या इकेचुकवु क्रिस्टियन उबिचुकवुने १९७ किलो वजन उचलले. त्याने १३३.६च्या गुणांसह रौप्य पदक जिंकले. तर स्कॉटलंडच्या मिकी युलेने १९२ किलो वजन उचलले. त्याला १३०.९च्या गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

 

सुधीरने जुन महिन्यात झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग एशिया-ओशियाना ओपन चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्याने पुरूषांच्या स्पर्धेत ८८ पासून ते सर्वोत्तम २१४ किलोग्राम वडन उचलले होते. तसेच तो एशियान पॅरा गेम्साठी पात्र ठरला आहे. ही स्पर्धा  पुढील वर्षी हॅंगझोऊ येथे होणार आहे.

महिला खेळाडूंची लाइटवेटमध्ये निराशा

याआधी झालेल्या महिला लाइटवेट स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौर आणि सकीना खातून यांंची अंतिम फेरीत निराशाजनक कामगिरी झाली. त्यांनी अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान राखले. मनप्रीतने पहिल्या प्रयत्नात ८७ आणि दुसऱ्या प्रयत्नात ८८ किलोग्राम वजन उचलले. मात्र ती तिसऱ्या प्रयत्नात ९० किलोग्राम वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिला ८९.६ गुण मिळाले. तसेच पुरूषांच्या लाइटवेट स्पर्धेत परमजीत कुमार अंतिम फेरीत तिन्ही प्रयत्नात अपयशी ठरला. यामुळे तो अंतिम स्थानावर राहिला.

भारताचे या स्पर्धेत एकूण २० पदके झाली आहेत. त्यामध्ये ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

कसलं भारी ना! दिनेश कार्तिकच्या पत्नीशी कांस्य पदक विजेत्या सौरव घोषालचे आहे जवळचे नाते

मोहम्मद शमीच्या टी२० कारकिर्दीवर नेहमीसाठी ब्रेक? निवडकर्त्यांनी कारण सांगून बसवलंय बाहेर

ठरलं तर! कॉमनवेल्थच्या सेमी फायनलमध्ये ‘या’ तगड्या संघाशी भिडणार भारत, जाणून घ्या तारिख आणि वेळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---