दिग्गज, महान अशी विशेषणेही कमी पडतील असा हा भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री (Sunil Chhetri). त्याच्यामुळे भारतीय फुटबॉलचे जगात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. त्याने नुकत्याच झालेल्या एएफसी एशियन कपमध्ये हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात गोल नोंदवत पराक्रम केला. हा पराक्रम करताच त्याने हंगेरीचा दिग्गज फुटबॉलपटू फेरेंक पुस्कासच्या आंतरराष्ट्रीय ८४ गोलची बरोबरी केली आहे. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर (विवेकानंद युवा भारती) झालेल्या या सामन्यात हा भारतीय फुटबॉल इतिहासातील क्षण घडला.
छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये संयुक्तपणे पाचवे स्थान पटकावले आहे. जागतिक स्तरावर याची चर्चा झाली. फिफा या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेनेही याची दखल घेतली आहे. त्यांनी छेत्रीवर एक व्हिडीओ सीरिज तयार करण्याचे ठरवले आहे. त्याचा जन्म बंगळुरू येथे झाला असून बालपण दिल्ली येथे गेले आहे. या दोन्ही शहरातील काही भागाचे शूटींग फिफाने केले आहे.
“या व्हिडीओसाठी बंगळुरूला छेत्री सध्या राहतो त्या भागांचे, त्याचे बालपण आणि आई-वडील दिल्लीत राहत आहेत त्या भागांचे आणि शूटींग करण्यात आले आहे,” असे फिफाच्या या कामाशी निगडीत असलेल्या एका व्यक्तिने पीटीआयला सांगितले आहे.
“भारताच्या फुटबॉलविषयी जेव्हा चर्चा होते तेव्हा पहिले नाव छेत्रीचेच पुढे येते. तो भारतीय संघाचा एक अविभाज्य भाग आहे. फिफाच्या त्या विशेष व्हिडीओसाठी त्याचेच नाव सगळ्यांना सुचले,” असे भारतीय फुटबॉल संघाच्या सहकाऱ्याने म्हटले आहे.
छेत्री हा सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पोर्तुगलचा ख्रिस्तियानो रोनाल्डो ११७ गोल करत पहिल्या आणि अर्जेंटिनाचा लियोनल मेस्सी ८६ गोल करत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सामन्यानंतर छेत्रीला त्याच्या विक्रमाबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मला विक्रमांकडे माझे लक्ष नसते आणि त्याचा विचारही मी करत नाही. मला स्टेडियमवर फक्त फुटबॉल खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे.”
👏👏 Congratulations to India's @chetrisunil11 for equalling the great Ferenc Puskas with his tally of 84 international goals! 🇮🇳💙#IndianFootball pic.twitter.com/cz9wOltByI
— Tottenham Hotspur (@Spurs_India) June 15, 2022
संघासाठी अद्वितीय कामगिरी करून सुद्धा ज्या खेळाडूंचेे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न अपुरे राहिले अशा फुटबॉलपटूंसाठी फिफाने एक व्हीडिओ तयार करण्याचे ठरवले आहे. यामध्ये भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनिल छेत्री याचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये २००५ मध्ये पदार्पण करणाऱ्या सुनिलने पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध गोल केला होता. ३७ वर्षीय छेत्रीच्या नावावर १२९ सामन्यात ८४ गोल आहेत. तो बेंगलुरू एफसी, मोहन बागान, इस्ट बंगाल आणि मुंबई सिटी एफसी या क्लब्सकडून खेळला आहे. यावेळी त्याने १४० पेक्षा अधिक गोल केले आहेत.
एएफसी हाँगकाँग क्वालिफायर सामन्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येतील याची अपेक्षा संघाला नव्हती. मात्र चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहुन भारतीय खेळाडूंना आनंद झाला. छेत्रीने ट्वीट करत त्याचे आभारही मानले आहे.
Dear Kolkata, just how special were you? The entire team and I are convinced that all of you at the Salt Lake, had a big part in all three of our wins. I hope we made you smile. These days with you were memorable. Let’s have a rendezvous soon. Until then, shobai bhalo thakben. 🙏 pic.twitter.com/JlJ7k32uRL
— Sunil Chhetri (@chetrisunil11) June 15, 2022
एएफसी एशियन कप २०२३स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र झाला असून यामध्ये २४ संघ खेळणार आहेत. छेत्रीने या स्पर्धेच्या क्वालिफायरच्या सलग तीन सामन्यात गोल केले आहेत. त्याने ४ गोल करत या हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या १७ धावांवर पडलेल्या ५ विकेट्स, मग कपिल पाजींनी खिंड लढवत ठोकल्या होत्या नाबाद १७५ धावा
बीसीसीआयनंतर आता आयसीसीही होणार मालामाल, मीडिया हक्कांच्या लिलावातून करणार भरमसाठ कमाई