भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात जबरदस्त खेळ दाखवत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सुपर फोर सामन्यातही त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. परंतु भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तोच पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत बोलताना त्याने एक महत्त्वाचा खुलासा केला होता. आपण कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर आपल्याला केवळ एमएस धोनीने मेसेज केला होता, असे त्याने सांगितलेले. विराटच्या या खुलाशानंतर भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
गावसकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले,
“मला माहित नाही की, ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे आहे. विराटने त्या खेळाडूचे नाव घेतले जो सर्वात आधी त्याच्या संपर्कात आला. त्याने त्यादेखील खेळाडूंचे नाव सांगायला हवे, ज्यांनी त्याला कॉल अथवा मेसेज केला नाही.”
विराटला पत्रकार परिषदेत भारतीय खेळाडूंचे एकमेकांशी संबंध कसे आहेत याबाबत प्रश्न विचारला होता.
मागील वर्षी विराटने भारताच्या सर्वप्रकारच्या संघाचे नेतृत्व सोडले. विराट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यातील संबंध नीट नव्हते, अशा बातम्या आलेल्या. त्याचे 2021 मध्ये टी20 विश्वचषकानंतर वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. तसेच 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पराभवानंतर त्याने कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला होता. त्याने सोशल मीडियावरून हे जाहीर केले होते. मात्र भारताच्या इतिहासात तो सर्वाधिक कसोटी सामने (40) जिंकणारा कर्णधार आहे. तसेच त्याने ऑस्ट्रेलियामध्ये भारताला पहिल्यांदा कसोटी विजेता बनण्यात मदत केली होती. विदेशी भुमिवर संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
जेमिमाला ‘बर्थ डे’ गिफ्ट! वुमेन्स आयपीएलमध्ये खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
VIDEO: जेव्हा टीम इंडिया हारत होती, तेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंगरुममध्ये नक्की चाललं काय होतं?
रिषभ की कार्तिक? कोण आहे टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक? चाहते विचारतायेत प्रश्न