भारतीय संघ गुरुवारी (10 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना इंग्लंडसोबत झाला. इंग्लंडने हा सामना 10 विकेट्सने नावावर केला आणि अंतिम सामन्यात धडक घेतली. या लाजिरवाण्या पराभवानंतर सर्वात जास्त टीका ही भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्यावर होतेय. भारतीय संघाचा कर्णधार बदलण्यात यावा अशी देखील मागणी होताना दिसतेय. त्याचवेळी भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार कोण असावा याबाबत भारतीय दिग्गजांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्याची मागणी सोशल मीडियावर होतेय. भारताचे काही माजी खेळाडू देखील रोहित शर्माच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे दिसून आले. अजय जडेजा यांनी तर थेट रोहित भारतीय संघासह कर्णधार म्हणून किती सामने खेळला? असाच सवाल विचारला होता. त्यानंतर आता माजी भारतीय दिग्गज सुनील गावसकर व माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी भारताच्या भविष्यातील कर्णधाराचा विचार करण्याची वेळ आल्याचे म्हटले.
सुनील गावसकर यांनी सामन्यानंतर बोलताना म्हटले,
“भारतीय संघाच्या भविष्याचा विचार केल्यास हार्दिक पंड्या नेतृत्व करू शकते. त्याने आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. हे निर्णय लवकर होतात की वेळ लागेल हे पाहणे रंजक आहे.”
दुसरीकडे हरभजन म्हणाला,
“भारतीय क्रिकेटमधील काही मोठे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. केवळ कर्णधार नव्हे तर प्रशिक्षक देखील बदलायला हवा. माझ्या मते हार्दिक नेतृत्वासाठी योग्य पर्याय ठरेल. इतकेच नव्हे तर या संघाचा प्रशिक्षक असा व्यक्ती असावा, जो अगदी काही कालावधीपूर्वी निवृत्त झाला आहे. आशिष नेहरा हा यासाठी दावेदार असेल. त्याने प्रशिक्षक म्हणून आपल्याला आयपीएलमध्ये निकालही दिला आहे.”
इतरही काही विदेशी क्रिकेटपटूंनी आता टी20 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोणीतरी युवा खेळाडू असावा असे म्हटले.
(Sunil Gavaskar And Harbhajan Singh Wants Hardik Pandya As India Next Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची पाठराखण केल्यानंतर सचिन होतोय ट्रोल; चाहते म्हणतायेत…
माजी इंग्लिश कर्णधाराची भारतावर सडकून टीका! म्हणाला, “एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांनी काय केलय?”