जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. रविवारी (11 जून) हा सामना संपल्यानंतर रोहितने डब्ल्यूटीसीच्या विजेतेपदासाठी तीन सामन्यांची मालिका खेळवली जावी, अशी मागणी केली. पण रोहितची ही मागणी भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांना पटली नाही, असेच दिसते.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर (Sunil Gavaskar ) म्हणाले, “हे खूप आधी ठरले होते. डब्ल्यूटीलीचा या हंगामातील पहिला सामना खेळण्यासाठी उतरण्याआधीच त्यांना माहिती होते की, शेवटची फक्त एकच सामना खेळवला जाणार आहे. अशात तुम्ही आधीच आयपीएलप्रमाणे मानसिकता बनवली पाहिजे होती. एक किंवा दोन दिवस कोणाचेही खराब जाऊ शकतात. पण हंगाम सुरू होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टीची कल्पना होती. त्यामुळे तुम्ही बेस्ट ऑफ थ्रीची मागणी करू शकत नाही. उद्या तुम्ही बेस्ट ऑफ फाईव्हची मागणीही कराल.”
दरम्यान, भारतीय संघ डब्ल्यूटीसी 2021-23 (WTC Final) हंगामात अनेक कसोटी मालिका खेळल्यानंतर या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या मते अनेक मालिका जिंकून इथपर्यंत पोहोचल्यानंतर विजेतेपद अवघ्या एका सामन्याच्या आधारे देणे योग्य नाहीये. यापूर्वी अशी मागणी अनेकदा झाली होती की, डब्ल्यूटीसी विजेतेपदासाठी कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जावी. मात्र, सुनील गावसकर भारतीय कर्णधाराच्या या मागणीशी असहमत असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताला विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावा हव्या होत्या. पण संघ 63.3 षटकांमध्ये 234 धावा करून सर्वबाद झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यामुळे प्रथम फलंदाजी केली. 121.3 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला होता. (Sunil Gavaskar criticized Rohit Sharma for demanding three matches for the WC final)
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीच्या मानाच्या तिन्ही ट्रॉफी उंचावणारे ऑसी पंचरत्न! स्वतः आयसीसीने शेअर केली पोस्ट
गंभीरचा अप्रत्यक्षपणे धोनीवर निशाणा! म्हणाला, ‘संघात काही खेळाडूंनाच हिरो ठरवलं गेलं…’