भारत व ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजा घेऊन विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटने काही महिन्यांपूर्वीच ही घोषणा केली होती की, आपल्या बाळाच्या जन्मासाठी तो पहिला सामना खेळून भारतात परतणार आहे. बीसीसीआयने देखील त्याला याबाबत परवानगी दिलेली होती, तर दुसरीकडे भारताचा युवा गोलंदाज टी नटराजन हा देखील पिता बनलेला असून तो सध्या ऑस्ट्रेलियामध्येच आहे. नटराजनला मिळालेल्या वागणुकीबद्दल भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारला आहे.
सुनील गावसकर यांनी स्पोर्ट स्टारमधील आपल्या कॉलमध्ये लिहले आहे की, “आयपीएल प्ले ऑफमधील सामन्यादरम्यान नटराजन एका मुलीचा पिता झाला होता. त्यानंतर तो थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रवाना झाला. नटराजन अजूनही ऑस्ट्रेलिया मध्येच आहे. आणि ते देखील एक खेळाडू म्हणून नाही, तर केवळ नेट गोलंदाज म्हणून.”
गावस्करांनी पुढे लिहिले आहे की, “नटराजन जानेवारीतील तिसऱ्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर आपल्या मुलीला भेटणार आहे. दुसरीकडे विराट कोहली महत्त्वपूर्ण मालिकेतील केवळ पहिला सामना खेळून भारतात परतला आहे.” याबाबत गावसकरांनी बोर्डाच्या नियमांवर निराशा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, दोघांसाठी एकसारखे नियम असायला पाहिजेत.
नटराजन आयपीएलमधील प्ले ऑफ सामन्यांदरम्यान पिता झाला होता. यानंतर तो थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी संघासोबत रवाना झाला होता. सध्या नटराजन भारतासाठी कसोटी मालिकेत नेट गोलंदाज म्हणून काम करत आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीनंतर नटराजनला कसोटी पदार्पणाची संधी मिळते की नाही, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अवघ्या एक रुपयात पोटभर जेवण.! भारताच्या माजी खेळाडूने सुरू केले गरजूंसाठी उपहारगृह
नया है यह…! ‘या’ देशात हेअर कटिंगसाठी देखील बाहेर जाऊ शकत नाहीत खेळाडू
IND vs AUS: तिसरा कासोटी सामना सिडनीऐवजी होणार ‘या’ शहरात?