---Advertisement---

IND vs WI: ‘सगळ्यांची बोलती बंद केली..’, श्रेयस अय्यरच्या शतकावर सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?

On: बुधवार, ऑक्टोबर 7, 2026 6:54 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) गेल्या मंगळवारी (6 ऑक्टोबर) लखनऊमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद 102 धावांची खेळी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शतक झळकावणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला. अय्यरच्या या शतकी खेळीमुळे भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) खूप आनंदी दिसले. त्यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले की, अय्यरने टीका करणाऱ्या सर्वांची बोलती बंद केली आहे.

याशिवाय, दिग्गज गावस्कर (Sunil Gavaskar on Shreyas Iyer) यांनी अय्यरचे हे शतक त्याच्या फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत असल्याचेही म्हटले. या शतकामुळे टी-20 क्रमवारीत अय्यरला 18 स्थानांचा फायदा झाला आहे. तो थेट 25 व्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. गावस्कर यांच्या मते, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांकडे अय्यरला रोखण्यासाठी कोणताही तोडगा नव्हता.

जिओस्टारशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “श्रेयस अय्यरची ही शानदार खेळी होती. तो थांबण्याचे नावच घेत नव्हता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी कोणत्याही लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली, तरी त्याच्याकडे प्रत्येक चेंडूचे उत्तर होते. भारतीय टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार झाल्यापासून श्रेयस अय्यरचा फलंदाजीतील फॉर्म काहीसा खराब राहिला आहे. अलीकडच्या काळात संघाला विजय मिळाले असले, तरी फलंदाज म्हणून त्याचा स्वतःचा फॉर्म चिंतेचा विषय राहिला होता.

गावस्कर पुढे म्हणाले, “त्यामुळे मोठी खेळी करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते आणि त्याने पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ते करून दाखवले. अय्यरने लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले आणि मधल्या षटकांमध्येही धावांचा वेग कायम ठेवला. त्याने 28 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने आणखी वेग वाढवत केवळ 15 चेंडूंमध्ये 50 वरून 102 धावांपर्यंत मजल मारली.

गावस्कर यांनी अय्यरच्या फलंदाजीच्या फॉर्मवर होत असलेल्या प्रश्नांवरही भाष्य केले. ते म्हणाले, “सोशल मीडियावर श्रेयसच्या फलंदाजीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात होते. या शतकाने त्या सर्वांची बोलती बंद केली आहे. ही खेळी श्रेयस अय्यर पुन्हा आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचा ठोस संकेत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---