भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेला काही दशकांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं नाव देण्यात आलं. हे नाव महान ऑस्ट्रेलियन फलंदाज ॲलन बॉर्डर आणि महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. परंतु आता ऑस्ट्रेलियानं 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर सुनील गावस्कर यांचा अपमान केला असल्याचं बोललं जात आहे.
झालं असं की, सिडनीमध्ये भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं बीजीटी 3-1 ने जिंकली. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ट्रॉफी समारंभासाठी फक्त ॲलन बॉर्डर यांनाच बोलावलं. त्यावेळी सुनील गावस्कर देखील मैदानात उपस्थित होते, परंतु त्यांना बोलावण्यात आलं नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या वागणुकीवर गावस्कर संतापले आहेत.
सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या आणि ॲलन बॉर्डर यांच्या नावावर असलेली ट्रॉफी सादर करण्यासाठी आमंत्रित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव करून दहा वर्षांत प्रथमच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ॲलन बॉर्डर यांनी संघाला ही ट्रॉफी दिली. त्यावेळी गावस्कर मैदानावर उपस्थित असूनही त्यांना यासाठी बोलावण्यात आलं नाही.
ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा केवळ ॲलन बॉर्डर यांनी विजेत्या संघाला ट्रॉफी दिली. 2018-19 मध्ये जेव्हा भारत जिंकला होता, तेव्हा देखील ॲलन बॉर्डर यांनीच ट्रॉफी दिली होती. 2020-21 मध्ये कोरोनामुळे अजिंक्य रहाणेनं एकट्याने ट्रॉफी उचलली आणि संघाच्या ताब्यात दिली होती. 2022-23 मध्ये सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माला ट्रॉफी दिली होती.
गावस्कर नंतर ‘कोड स्पोर्ट्स’शी बोलताना म्हणाले, “मला पुरस्कार सोहळ्याला जायला आनंद झाला असता. शेवटी ही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आहे, जी ऑस्ट्रेलिया आणि भारताशी संबंधित आहे. मी मैदानावर उपस्थित होतो. मला फरक पडत नाही की ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला दिली गेली. ते चांगले क्रिकेट खेळले आणि जिंकली,. मात्र मला ॲलन बॉर्डर सोबत ट्रॉफी द्यायला चांगलं वाटलं असतं.
हेही वाचा –
लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला कसोटी संघात करावे लागतील हे 3 मोठे बदल, रोहित शर्माला वगळणार का?
रोहित-विराटच्या भविष्यावर गौतम गंभीरची मोठी प्रतिक्रिया, पराभवानंतर बोलताना म्हणाला…
वन मॅन आर्मी! या खेळाडूने जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार