---Advertisement---

एमएस धोनीला मेंटर केल्यानंतर सुनील गावसकरांना आनंदाबरोबर सतावतेय ‘या’ गोष्टीची चिंता

---Advertisement---

येत्या ऑक्टोबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान पाहायला मिळणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी बुधवारी (८ सप्टेंबर) बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ निवडला आहे. तसेच सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय म्हणजे, एमएस धोनीला या संघाचा मार्गदर्शक (मेंटर) बनवण्यात आले आहे. या निर्णयानंतर माजी भारतीय कर्णधारांनी देखील आपली प्रतिक्रीया दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी धोनीची सल्लागार म्हणून निवड केल्यानंतर स्पष्ट केले की, हा निर्णय घेण्यापूर्वी कर्णधार कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापकांसोबत चर्चा करण्यात आली होती. या निर्णयानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी देखील एमएस धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘आज तक’ चॅनेलवर बोलताना धोनीला मार्गदर्शक पद दिल्याबाबत आपले मत मांडले. यासह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या ज्यावेळी ते भारतीय संघाचे मार्गदर्शक होते.

सुनील गावसकर जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की,”२००४ साली माझी भारतीय संघासाठी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती. आता सल्लागार या शब्दा ऐवजी मेंटॉर या शब्दाचा वापर केला जातो. मी जेव्हा संघासोबत जोडलो गेलो होतो त्यावेळी जॉन राईट्स यांच्या चिंतेत वाढ झाली होती. त्यांना सतत असे वाटायचे की, मला त्यांची जागा घ्यायची आहे,” त्यावेळी जॉन राईट्स हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.

तसेच ते पुढे म्हणाले की, “परंतु शास्त्रीला माहीत आहे की, धोनीला प्रशिक्षक होण्यात रस नाही. धोनी आणि शास्त्री यांची जोडी जमली, तर भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत नक्कीच फायदा होईल. परंतु तिथे जर संघ निवडीबाबत आणि एखादा निर्णय घेण्याबाबत मतभेद निर्माण झाले तर, त्याचा परिणाम संघावर होऊ शकतो.”

“परंतु, माझे असे मत आहे की, धोनीच्या येण्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. धोनीकडे भरपूर अनुभव आहे. माझ्या मते धोनी भारतीय संघासोबत असणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु, या दोघांमध्येही (शास्त्री आणि धोनी) मतभेद निर्माण व्हायला नको. दोघेही एकविचाराने पुढे गेले. तर भारतीय संघासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल.”(Sunil Gavaskar is concern for MS Dhoni as mentor in T20 world cup of team India)

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :  – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंची भारतीय संघात निवड होण्यामागे विराट-शास्त्रींचा हात?

टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंची भारतीय संघातील निवड ठरली ‘सरप्राईज एन्ट्री’

बांगलादेशच्या गोलंदाजाने आपल्याच गोलंदाजीवर हवेत सूर मारत पकडला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---