भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा कठीण परिस्थितीतही मैदानावर शांत स्वभावासाठी ओळखला जातो. सामना कुठलाही असो, कोणतीही परिस्थिती असो, त्यात धोनी नेहमी शांत दिसतो. त्याच्या याच स्वभावामुळे त्याला ‘कॅप्टन कूल‘ म्हणून ओळखले जाते. भारतच नाही, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी धोनीला ‘कॅप्टन कूल’ नावाने पुकारतात. मात्र, भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचे मत जरा वेगळे आहे. त्यांच्या मते, धोनीव्यतिरिक्त आणखी एक ‘कॅप्टन कूल’ आहे. चला तर त्या खेळाडूविषयी जाणून घेऊयात…
खरं तर, सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी 1983 साली भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना खरा ‘कॅप्टन कूल’ (Captain Cool) म्हटले आहे. नुकतेच माध्यमांशी बोलताना गावसकरांनी म्हटले की, कपिल देव खरा ‘कॅप्टन कूल’ आहे. त्यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने 1983 सालचा विश्वचषक जिंकला होता. ते म्हणाले की, “1983मध्ये कपिलने बॅट आणि चेंडू दोन्हीतून शानदार प्रदर्शन केले होते. अंतिम सामन्यात विवियन रिचर्ड्सचा झेल कधीच विसरला नाही पाहिजे. त्यावेळी आवश्यकतेनुसार त्याचे नेतृत्व गतिमान होते. जेव्हा कोणी खेळाडू झेल सोडत असेल किंवा क्षेत्ररक्षणात चुका करत असेल, तेव्हाही त्याचे हास्य त्याला खरा कर्णधार बनवत होती.”
भारताने 1983 विश्वचषकाची सुरुवात कमकुवत संघाच्या रूपात केली होती. मात्र, अंतिम सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून भारताने विश्वचषक आपल्या नावावर केला. कपिल देव यांनी स्पर्धेत बॅट आणि चेंडू दोन्ही विभागात शानदार प्रदर्शन केले होते. तसेच, विवियन रिचर्ड्स यांना बाद करणारा झेल इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला गेला.
गावसकरांनी मजेत असेही सांगितले की, ज्याक्षणी भारताने 1983चा विश्वचषक जिंकला होता, ती टूथपेस्टची एक शानदार जाहिरात असू शकत होती. कारण, सर्व खेळाडू आणि कर्मचारी सातत्याने हसत होते. ते म्हणाले की, “विजयानंतरचे क्षण शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. ही टूथपेस्टची शानदार जाहिरात बनू शकत होती. कारण, आमच्या आजूबाजूला सर्वजण हसत होते. हे पाहणे काळजाला भिडणारे होते.”
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली भारताने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनंतर 2011 साली भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली दुसरा वनडे विश्वचषक जिंकला होता. यापूर्वी धोनीने भारताला 2007 साली उद्घाटनाच्या टी20 विश्वचषक विजयाचा मानकरीही बनवले होते. तसेच, 2013मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. (sunil gavaskar on captain cool of team india said not ms dhoni this is the original captain cool)
महत्वाच्या बातम्या-
‘रिंकू बाप आहे…’, चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना KKRचा मालक शाहरुखचे स्टार खेळाडूबाबत मोठे विधान
धोनीमुळे ‘Candy Crush’ गेमची चांदी! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 तासात ‘एवढ्या’ लाख लोकांनी केली डाऊनलोड?