भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच यो-यो टेस्ट (Yo-yo Test) बरोबर डेक्सा टेस्टही (DEXA Test) महत्वाची केली आहे. या चाचण्यामुळे खेळाडू किती फिट आहेत हे लवकरच कळणार आहे. यामुळे खेळाडू काहीसे चिंतेत पडलेले दिसत आहेत. त्याचवेळी भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी यो-यो टेस्ट गरजेची नसल्याचे म्हटले आहे.
बीसीसीआयने नुकतेच 2023ची पहिले चर्चासत्र केले. त्यामध्ये बोर्डने खेळाडू यो-यो टेस्टमध्ये नापास झाला तर संघात जागा मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू जिममध्ये घाम गाळताना दिसले आहेत. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी फिटनेस साठी यो-यो टेस्ट आवश्यक नसल्याचे म्हटले.
“क्रिकेटमध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळा फिटनेस असतो. फलंदाजांसाठी, गोलंदाजांसाठी इतकेच नव्हे तर यष्टीरक्षकांसाठी देखील फिटनेसच्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला अगदीच ही टेस्ट करायची असेल तर सर्वांसमक्ष करावी. जेणेकरून सर्वांना समजेल की यामध्ये कोण पास आणि कोण नापास झाले आहे.”
गेली अनेक वर्ष फुटबॉल खेळासाठी ही पद्धत वापरली जाते. हॉकीमध्येही ही पद्धत वापरली जाते. फुटबॉल आणि हॉकी सामन्यातील यो यो टेस्टचे निकाल हे क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. आजकाल प्रो कबड्डीचा सराव करतानाही कबड्डीपटू ही पद्धत वापरताना दिसतात. क्रिकेटपटूंसाठी यो यो एन्ड्युरन्स टेस्टमध्ये 19.5 हा उत्तम स्कोर समजला जातो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यात अग्रस्थानी असून त्यांचा साधारण स्कोर हा 21 असतो.
विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना प्रत्येकासाठी भारतीय संघात प्रवेशाचे पहिले द्वार होते. युवराज सिंग, संजू सॅमसन व अंबाती रायुडू यासारखे खेळाडू केवळ या टेस्टमध्ये नापास झाल्याने संघाबाहेर गेलेले. यामध्ये मनीष पांडे भारताचा सर्वात फिट खेळाडू म्हणून समोर आलेला.
(Sunil Gavaskar Opposed YoYo Test For Team India Entry)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस
सूर्याने सांगितले आपल्या ‘सिक्रेट कोच’चे नाव! दिले आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय