माजी भारतीय दिग्गज खेळाडू आणि सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राडूल द्रविडने अखेर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून त्याच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर द्रविडने आता या पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेला त्याचा अर्ज दाखल केला आहे.
द्रविडने या पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी त्याचे स्वागत केले आहे. गावरकरांच्या मते द्रविडने अर्ज दाखल केल्यानंतर आता इतर कोणी अर्ज दाखल करण्याची गरजच उरली नाही.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपादासाठी मागच्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. या पदासाठी अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इतरही अनेक विदेशी नावांची चर्चा होती, पण आता राहुलने या पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तो प्रशिक्षकपदासाठी पहिली पसंती असेल. तसेच तो इतर अर्जदारांच्या पुढे असेल, असे मत गावसरकांनी व्यक्त केले आहे.
सनिल गावरकर स्पोर्ट्स तकसोबत चर्चा करत होते. यावेळी त्यांनी द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी केलेल्या अर्जाविषयी त्यांचे मत मांडले आहे. ते म्हणाले की, “कसलीच शंका नाही, त्याला मुख्य प्रशिक्षक केले पाहिजे. मला वाटते की, आता दुसऱ्या कोणी कर्ज नाही केला पाहिजे. ज्याप्रकारे द्रविडने १९ वर्षाखलील संघाला सांभाळले, त्यांना मार्गदर्शन केले आणि एनसीएमध्ये ज्याप्रकारचे त्याचे काम राहिले आहे, त्यावरून त्याची क्षमता समजते. तो फक्त मैदानातच नाही, तर प्रशासकिय कामांमध्येही खूप दक्ष आहे. त्यामुळेच मला वाटते की, त्याची नियुक्त निश्चित आहे आणि प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणे, फक्त एक औपचारिकता आहे.”
द्रविडने मुख्य प्रशिक्षक बनवले गेल्यानंतर एनसीएच्या प्रमुखपदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे या दोघांपैकी एकाची नियुक्ती केली जोऊ शकते, असे सांगितले जात आहे. तसेच भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकासाठी भारताचे माजी वेगवान गोलंदाज पारस म्हाम्ब्रे यांनी अर्ज दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फिरकीची जादू! टी२० विश्वचषकात एका सामन्यात ५ विकेट्स घेणारे तीन फिरकीपटू
आपल्या खराब फॉर्मविषयी वॉर्नरने दिली प्रतिक्रिया; ‘असा’ करतोय सराव
केवळ रोहितच नाही, तर ‘हे’ दोन भारतीय देखील टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेत शुन्यावर बाद