---Advertisement---

“संघ जिंकतोय पण रोहित फॉर्ममध्ये नाही”, भारतीय दिग्गजाने दिला धोक्याचा इशारा

On: बुधवार, ऑक्टोबर 26, 2022 6:17 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup)भारताची सुरूवात उत्तम झाली. पाकिस्तानवर मिळवलेल्या पहिल्या विजयाने भारताने दुसऱ्या सामन्यासाठी लगेच सरावाला सुरूवात केली. भारतीय संघाने मंगळवारी (26 ऑक्टोबर) कसून सराव केला. भारतीय संघ आपला पंधरा वर्षाचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे. संघाने विजयी सुरुवात केली असली तरी संघाला अजून एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केले.

आपल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने मेलबर्न येथे पाकिस्तानला मात दिली. या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. असे असले तरी, विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा फॉर्ममध्ये नसल्याचे गावसकर यांनी म्हटले. एका वृत्तपत्राशी बोलताना गावसकर म्हणाले,

“भारतीय संघ जिंकतोय ही चांगली बातमी आहे. मात्र, त्याचवेळी संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा फॉर्ममध्ये नाही हे आपल्याला विसरून चालणार नाही. अलीकडच्या काळात त्याने आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी केलेली नाही. तो त्याच्या क्षमतेनुसार खेळल्यास इतरांसाठी काम सोपे होऊन जाईल. मला अपेक्षा आहे की तो यानंतर चांगला खेळ दाखवेल.”

रोहित ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून फारसा यशस्वी ठरलेला नाही. सराव सामन्यातही तो मोठ्या धावसंख्या रचू शकला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही हारिस रौफच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 7 चेंडूत 4 धावा काढल्या होत्या. मात्र, विराट कोहली हार्दिक पंड्याच्या शानदार खेळाने भारताने सामना आपल्या नावे केला. भारताचा पुढील सामना 27 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे नेदरलँड्सविरूद्ध होईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---