सध्या भारतात वनडे विश्वचषक खेळला जात आहे. भारतातील दहा शहरांमध्ये हा विश्वचषक पार पडतोय. स्पर्धेच्या पहिल्या तीन दिवशी चार सामने खेळले गेले. या सामन्यांना तुलनेने कमी प्रेक्षक लाभले. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भारताचे माजी कर्णधार व महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
या विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला होता. तब्बल एक लाख तीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमवर सुरुवातीला अगदी दोन ते तीन हजार प्रेक्षकच उपस्थित झाले होते. सायंकाळच्या सत्रात प्रेक्षकांची संख्या वाढलेली दिसली. हा अधिकृत आकडा 47 हजार असल्याचे सांगण्यात आलेले. त्यानंतर पाकिस्तान व नेदरलँड्स यांच्यातील सामन्याला देखील कमी प्रेक्षक दिसले. याव्यतिरिक्त बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याकडे देखील प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसले.
यात संपूर्ण मुद्द्यावर बोलताना गावसकर म्हणाले,
“एक क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेटपटू भारतीय म्हणून मला याची लाज वाटते. हा सर्वात खराब विश्वचषक सिद्ध होईल. कमी प्रेक्षक, कोणत्याही प्रकारचे स्कोर बोर्ड नाहीत आणि अत्यंत ढिसाळ नियोजन बीसीसीआयकडून केले गेले आहे.”
हा विश्वचषक ज्याप्रकारे जवळ येत होता तशा प्रकारे बीसीसीआय व आयसीसी संभ्रमात असलेले दिसून येत होते. सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अचानक बदल करण्यात आला. तसेच तिकिटांची विक्री अगदी पारंपारिक पद्धतीने केली गेली. तसेच काहींना रजिस्ट्रेशन करून देखील मिळाली नाही अशी सोशल मीडियावर चर्चा झालेली आहे. या सर्वामुळे आयोजकांवर टीका होताना दिसतेय.
(Sunil Gavaskar Slams BCCI On Empty Stands In World Cup)
हेही वाचा-
BREAKING: क्रिकेटमध्येही यंग इंडियाने कमावले गोल्ड, ऋतुराजच्या नेतृत्वात घडला इतिहास
BREAKING: अभूतपूर्व गोंधळानंतरही कबड्डीचे गोल्ड भारताकडेच, इराणची झुंज अपयशी