वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे सोमवारी (24 जुलै) समाप्त झाला. अखेरच्या दिवशी पडलेला पाऊस व यामुळे मैदान खेळण्यासाठी योग्य न राहिल्याने सामना अनिर्णित संपवण्यात आला. यासह भारतीय संघाने ही मालिका 1-0 अशी जिंकली. भारतीय संघाने हा विजय मिळवला असला तरी भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या विजयानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
या मालिकेत भारतीय संघाने काही युवा खेळाडूंना देखील संधी दिली होती. त्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाने छाप पाडली. याव्यतिरिक्त संघाचा कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांनी देखील या दौऱ्यावर शतके झळकावली. मात्र, त्यांच्या चांगल्या कामगिरीनंतर गावसकर यांनी निवड समितीला काही प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले,
“या मालिकेत यशस्वी जयस्वाल, ईशान किशन यांच्यासारखे खेळाडू यशस्वी ठरले. भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. त्याचवेळी निवड समितीने आता विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या पर्यायांबद्दल देखील चाचपणी करायला हवी. त्यांनी या दौऱ्यावर शतके झळकावली असली तरी त्याचा फायदा नाही. भारतीय संघ आता थेट दक्षिण आफ्रिकेत खेळेल. त्यावेळी आपल्याला हेच खेळाडू घेऊन जावे लागतील. कारण, तुमच्याकडे संधी असताना तुम्ही या दौऱ्यावर युवा खेळाडूंना निवडले नाही.”
या मालिकेआधी अनुभवी चेतेश्वर पुजारा याला संघातून वगळत यशस्वी जयस्वाल याला संघात स्थान दिले होते. यशस्वीने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. तर, यष्टीरक्षक ईशान किशन याने देखील वेगवान फटकेबाजी करत आपली पहिली मालिका गाजवली.
(Sunil Gavaskar Slams Selection Committee Virat Kohli And Rohit Sharma After West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा फेरबदल! मिसबाह उल हकची पीसीबीमध्ये पुन्हा एन्ट्री
लवकरच जन्माला येणार बेबी मॅक्सवेल! भारतीय संस्कृतीनुसार पार पडले विनी रमनचे डोहाळे जेवण