टी२० विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत खूपच खराब प्रदर्शन केले आहे, जे चाहत्यांना अपेक्षित नव्हते. भारताने टी२० विश्वचषकातील त्याचे पहिले दोन्ही सामने गमावले आहेत आणि संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते. आयपीएलनंतर लगेच विश्वचषकाला सुरुवात झाल्यामुळे खेळाडूंना विश्रांती करता आली नसावी आणि त्याचाच परिणाम त्यांच्या प्रदर्शनावर दिसत आहे. संघाच्या खराब प्रदर्शनामुळे अनेकांनी आयपीएलवर प्रश्न उपस्थित केले होते. आता भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी या प्रश्नांना उत्तर दिले आहे.
गावसकरांच्या मते आयपीएल अशी स्पर्धा आहे, जिच्यापुढे टी२० विश्वचषकही फिका आहे. दरम्यान, विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडू यूएईत आयपीएल खेळत असल्यामुळे त्याचा फायदाही यूएईत खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात होईल असा अंदाज बांधला जात होता. तसेच विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारताला जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, सध्या चित्र उलटे दिसत आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाच्या झालेल्या पराभवानंतर गावसकर म्हटले की, “आपली आयपीएल जगातील सर्वोत्तम देशांतर्गत टूर्नामेंट आहे. आयपीएलपेक्षा मोठे काहीच नाहीये. टी२० विश्वचषकही आयपीएलसमोर फिका वाटतो. लोक सुरुवातीपासून म्हणत आले आहेत की, टी-२० विश्वचषकात आयपीएल किंवा कोणत्या दुसऱ्या लीगसारखी चमक नाहीये.”
अनेकदा तुम्हाला बाहेरच्या लोकांच्या गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्यामुळे तुमच्या प्रदर्शनात सुधार होत असतो, असे गावसकरांनी पुढे सांगितले.
ते म्हणाले की, “बाहेरचे जग पूर्णपणे साउंडप्रूफ नाहीये. कोणतरी काहीतरी नक्कीच म्हणेल, जे तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हटले जाते की, बाहेर जी चर्चा होते, त्याचा आम्हाला काही फरक नाही पडत, जे एकप्रकारे योग्यही आहे. कारण संघाला नाही वाटत की, तुमच्यावर बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव पडाला, पण बाहेरच्या अनेक गोष्टींचा प्रभाव योग्य प्रकारेही पडतो. होऊ शकते की, बाहेर अशी एखादी चर्चा होत असेल, जी योग्य आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीनंतर भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ ५ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार