भारतीय दिग्गजांच्या यादीत सुनील गावसकर आणि सौरव गांगुली यांना गणले जाते. दोघांनीही सलामीला फलंदाजी करत वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या दोघांच्या बाबतीत एक योगायोगही घडला आहे. गावसकर आणि गांगुली यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या 99व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. 1983मध्ये गावसकरांनी वेस्ट इंडिज विरुद्ध 236 धावा केल्या होत्या. ज्या त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी खेळी ठरली. त्याच्या 24 वर्षानंतर गांगुलीने त्याचे पहिले आणि एकमेव द्विशतक पाकिस्तानविरुद्ध केले. बेंगलुरूमध्ये झालेल्या त्या सामन्यात गांगुलीने 239 धावा केल्या होत्या.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे दोघेही फुटबॉलचे मोठे चाहते आहेत. गांगुली तर इंडियन सुपर लीगमधील ऍटलेटिको द कोलकाताचा संस्थापक सदस्य राहिला आहे. 2014 मध्ये तो स्थापन झालेल्या या संघाचे दोन वर्षापूर्वीच मोहन बागानमध्ये विलीनीकरण करण्यात आले. या करण्याच्या प्रक्रियेत गांगुलीने महत्वाची भुमिका बजावली होती. दुसरीकडे गावसकर हे अर्सेनलचे चाहते आहेत.
अर्सेनल इंग्लिश प्रीमियरमधील प्रसिद्ध क्लब आहे. याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, “मी अर्सेनलचा खूपच चाहता नसून फॉलोअर आहे. मी माझ्या मुलाला जो मॅंचेस्टर युनायटेडचा चाहता होता, त्याला चिडवत असे की मला कोणत्याही चार अर्सेनलच्या खेळाडूंची नावे विचार. तेव्हा मी सांगे आर्सेन वेंगर, थियरी हेन्री आणि डेनिस बर्गकॅम्प. वेंगर हे एमएल जयसिम्हा सारखे दिसत, यामुळे त्यांचा खेळ मला आवडायचा. हेन्री हा पण एक उत्तम फुटबॉलपटू होता. त्याच्या प्रभावी खेळीने मी भारावून जायचो. त्याने मला एका जर्सीवर साईन करून दिली आहे.” गावसकर हे बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीवेळी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर बोलत होते.
यादरम्यान गावसकरांनी अचानकपणे गांगुलीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “सौरभ गांगुली हॅलो? कुठे आहे ती जर्सी मी कोलकाताला येत आहे 12 तारखेला, यावेळी तरी ती जर्सी नक्की दे. मग मला कोणतेही कारण चालणार नाही. तू आता बीसीसीआयचा अध्यक्ष नाही राहिला. यामुळे तुझ्याकडे वेळ आहे. तो हेन्रीने साईन केलेला शर्ट शोध आणि मला दे.”
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्याचे समालोचन गावसकर टीव्हीवर करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूच्या मुलीला गंभीर आजार, स्पर्धेतून घेतली माघार
अरे त्याच्यापेक्षा बॉलर बरे, धावा तरी करतील! केएल राहुल चाहत्यांकडून ट्रोल