ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 21 धावांनी पराभव स्वीकारला. चेन्नई येथे झालेला मालिकेतील हा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकत 2-1 अशा अंतराने मालिका नावावर केली. भारतीय संघाच्या या पराभवानंतर अनेकांनी संघावर टीका केली आहे. त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार व दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला स्पष्ट शब्दात हा पराभव हलक्यात न घेण्याची सूचना केली.
चेन्नई वनडेत भारतीय संघाला विजयाची संधी होती. मात्र, फलंदाजांना मोठ्या भागीदाऱ्या करता आल्या नाहीत. याच कारणाने भारतीय संघाचा पराभव झाला. सामन्यानंतर प्रसारण वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले,
“ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी भारतीय संघावर दबाव टाकला. या दबावामुळे आपले फलंदाज एकेरी धावा घेऊ शकले नाहीत. सामना भारतीय संघाने जिंकायला हवा होता. मात्र, तसे होऊ शकले नाही. भारतीय संघ अशी चूक करत असतो. आता आयपीएल सुरू होईल आणि भारतीय संघ हा पराभव विसरून जाईल. मात्र, कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हे विसरायला नको. हे विश्वचषकाचे वर्ष आहे. आपल्याला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल.”
मुंबई येथे झालेला पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने तर विशाखापट्टणम येथील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलेला. त्यामुळे चेन्नई वनडेला अंतिम सामन्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ऑस्ट्रेलिया संघाने सर्व फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर 269 धावा उभ्या केलेल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी विराट कोहली व हार्दिक पंड्या यांनी झुंज दिली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावून ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक मालिकाविजय मिळवून दिला.
(Sunil Gavaskar Warning To Captain Rohit Sharma And Coach Rahul Dravid For His Approach Against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडते फक्त ऑस्ट्रेलियाच! भारतात येऊन पाच वर्षात तीनदा दिलाय धोबीपछाड
रोहित शर्मावर मान खाली घालण्याची वेळ, ऑस्ट्रेलियाकडून कर्णधाराचा मोठा विक्रम मोडीत