भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना ओल्या आउटफिल्डमुळे रद्द करावा लागला. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. फ्लोरिडातील हा तिसरा सामना आहे जो पावसामुळे रद्द करावा लागला. यापूर्वी श्रीलंका विरुद्ध नेपाळ आणि अमेरिका विरुद्ध आयर्लंड हे दोन सामनेही एकही चेंडू न फेकता रद्द करावं लागलं होतं. सलग सामनं रद्द झाल्यानं दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) संतापले आहेत. त्यांनी त्यांचा राग आयसीसीवर (ICC) काढला आहे.
एका टीव्ही कार्यक्रमात सुनील गावसकर म्हणाले की, “ज्या ठिकाणी संपूर्ण मैदान झाकण्यासाठी कव्हर नाहीत अशा ठिकाणी आयसीसीनं सामनं आयोजित करू नयेत आणि खेळपट्टी झाकून तुम्ही बाकीचं मैदान ओलं होऊन देऊ शकत नाही.”
सुनील गावसकर यांच्याशिवाय इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉननंही सामना रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मायकल वॉन म्हणाला, “संपूर्ण क्षेत्र कव्हर करण्यासाठी आमच्याकडे अधिक कव्हर्स का नाहीत? हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. खेळात इतका पैसा असूनही, ओल्या आउटफिल्डमुळे आम्हाला सामना रद्द करावा लागतो.”
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे ओलं आउटफिल्ड आणि पावसामुळे नाणेफेक होऊ शकली नाही. पंचांनी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता मैदानाची पाहणी केली, त्यानंतर रात्री 9 वाजता भारतीय वेळेनुसार, पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रात्री 9 वाजता पाहणी केल्यानंतर पंचांना आऊटफिल्ड व्यवस्थित वाटलं नाही आणि सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. मैदान कोरडं करण्याचं अनेक प्रयत्न करण्यात आलं पण मैदानावरील कर्मचाऱ्यांना अपयश आलं आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. दोन्ही संघांचा यंदाच्या टी20 विश्वचषकातील साखळीफेराचा अखेरचा सामना होता. आता भारतीय संघ सुपर 8 मधील सामन्यासाठी गुरुवारी (20 जून) रोजी अफगाणिस्तानशी भिडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध कॅनडा सामन्याला पावसानं लावली हजेरी, सामना रद्द
भारतीय संघ गाठणार थेट अंतिम फेरी; जाणून घ्या समीकरण!
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं केलं, पाकिस्तान कर्णधार बाबर आझवर वादग्रस्त वक्तव्य