कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू सुनील नरेन त्याचा गोलंदाजी शिवाय ताबडतोब फलंदाजीसाठी ओळखला जातो. या खेळाडूने सलामीवीर म्हणून खूप आठवणीत राहतील अशा पारी खेळल्या आहेत. खास करून गौतम गंभीरच्या कार्यकाळात सुनील नरेन सातत्याने सलामीवीर म्हणून खेळत होता. आयपीएलमध्ये सुनील नरेनने ओपनिंग करताना 180 च्या स्ट्राईक रेटने 488 धावा केल्या आहेत. पण यावेळी सुनील नरेन कितव्या स्थानी फलंदाजी करेल? किंवा तो सलामीवीर म्हणून खेळताना दिसेल का? यावर स्वतः त्यानेच प्रतिक्रिया दिलेली आहे. जाणून घेऊया.
त्याने संकेत दिले आहेत की, कोलकाता नाईट रायडर्ससाठी सलामीवीर म्हणून खेळणे त्याला जास्त आवडेल. आयपीएल 2025 पर्यंत सुनील नरेन कोलकाता नाईट रायडर्ससाठी पिंच हिटर भूमिका साकारत आला आहे. पण गौतम गंभीरच्या कार्यकाळात सुनील नरेनने फिल साल्ट सोबत ओपनिंग करताना चांगल्या भागीदारी रचलेल्या आहेत. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामन्याआधी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, मी माझ्या संघाच्या गरजेप्रमाणे आणि परिस्थितीनुसार खेळण्यासाठी तयार आहे. पण मला सलामीवीर म्हणून खेळणे जास्त आवडेल.
सुनील नरेनने त्याच्या फलंदाजी क्रमांकाबद्दल म्हटले की, हे संघाच्या गरजेवर अवलंबून आहे. पण या गोष्टीत कोणती शंका नाही की मला ओपनिंग करायला आवडते. खास करून मागील वर्ष माझ्यासाठी सलामीवीर म्हणून चांगलं होते. पण मी माझ्या संघाच्या गरजेप्रमाणे फलंदाजी क्रमांक बदलण्यासाठी तयार आहे. खूप काळापासून सुनील नरेन कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या यशामध्ये सुनील नरेनची सुद्धा भूमिका मोठी आहे. आयपीएल 2012 हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी सुनील नरेन पहिल्यांदा खेळला होता.






