इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी (२१ एप्रिल) डबल हेडर सामने खेळवले गेले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आमनेसामने आले. या सामन्यात सीएसकेने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत केकेआरचा दारूण पराभव केला. मात्र, हंगामातील पहिला सामना खेळत असलेल्या केकेआरच्या सुनील नारायणने या सामन्यात आयपीएल इतिहासातील एका खास विक्रमाची नोंद केली.
नारायणचा नवा आयपीएल पराक्रम
केकेआरचा अष्टपैलू सुनील नारायण आयपीएल २०२१ मधील आपला पहिला सामना खेळत होता. दुखापतीमुळे तो पहिल्या तीन सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. या सामन्यात नारायणने ४ षटके टाकताना ३४ धावा देऊन मोईन अलीचा महत्वपूर्ण बळी मिळविला. नारायणने या बळीसह आयपीएलमधील एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
सुनील नारायणचा केकेआरसाठी हा १२१ वा सामना होता. नारायणने या १२१ सामन्यात १२८ बळी पूर्ण केले. यासह नारायण आयपीएल इतिहासात एकाच संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा फिरकीपटू ठरला. यापूर्वी हा विक्रम दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगच्या नावे होता. हरभजनने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना १२७ बळी मिळवले होते.
केकेआरचा प्रमुख खेळाडू आहे नारायण
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणारा नरीन आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम विदेशी खेळाडूंपैकी एक आहे. २०१२ असून तो केवळ केकेआर संघासाठी खेळत असून, केकेआरने जिंकलेल्या २०१२ व २०१४ विजेतेपदांमध्ये त्याची निर्णायक भूमिका होती. नरीन अनेकदा संघासाठी सलामीवीर म्हणून देखील भूमिका पार पाडताना दिसतोय.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिनंदन फाफ! डू प्लेसिसने टी२० कारकिर्दीत केला ‘हा’ मैलाचा दगड पार
डायव्हिंग डेव्हिड! वॉर्नरने पकडलेला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ
फिंचला हटवून हा खेळाडू टी२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी, तर विराट ‘या’ क्रमांकावर