अमेरिकेत सुरू होत असलेला मेजर लीग क्रिकेट (एमएलसी 2023) स्पर्धेला 13 जुलै पासून सुरुवात होत आहे. सहा संघांच्या या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सच्या मालकीचा लॉस एंजेलिस नाईट रायडर्स हा संघ देखील सहभागी होत आहे. स्पर्धेला आणखी तीन दिवसांचा अवधी असताना नाईट रायडर्स फ्रॅंचाईजीने आपला कर्णधार जाहीर केला आहे. मागील अनेक वर्षांपासून नाईट रायडर्स संघासह जोडला गेलेला वेस्ट इंडीजचा दिग्गज फिरकीपटू सुनील नरीन या संघाचे नेतृत्व करेल.
या स्पर्धेत अमेरिकेतील सहा शहरांचे संघ सहभागी होत आहेत. यातील पाच संघांमध्ये आयपीएल फ्रॅंचाईजींची भागीदारी आहे. नाईट रायडर्स संघाने नरीनकडे संघाचे नेतृत्व दिले. नरीन 2012 पासून आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळतो. याव्यतिरिक्त कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रिबॅगो नाईट रायडर्स व इंटरनॅशनल लीग टी20 मध्ये अबुधाबी नाईट रायडर्स या संघांसाठी तो खेळतो. त्यानंतर आता या स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
त्याच्यासह या संघात न्यूझीलंडचा दिग्गज सलामीवीर मार्टिन गप्टिल, आंद्रे रसेल, जेसन रॉय, ऍडम झम्पा, लॉकी फर्ग्युसन व रायली रूसो हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देखील सहभागी आहेत. भारताला 2012 अंडर 19 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद तसेच एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम करणारा जसकरण सिंग व अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खान या संघाचा भाग आहे.
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघ- सुनील नरीन (कर्णधार), गप्टिल, आंद्रे रसेल, जेसन रॉय, ऍडम झम्पा, लॉकी फर्ग्युसन, रायली रूसो, उन्मुक्त चंद, जसकरण सिंग, अली खान, अली शेख, भास्कर यादरम, कॉर्न ड्राई, नितिश कुमार, सैफ बदर व शेडली शेलविक.
(Sunil Narine Appointed As Los Angelis Knight Riders Skipper In MLC 2023)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
सातासमुद्रापार विश्वविजेती बनली सातारची आदिती! तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये घेतला सुवर्णवेध