टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आयपीएलमधील केकेआरचा प्लॅन भारतीय संघात लागू करू शकतो. ज्याप्रकारे गंभीरनं केकेआरमध्ये सुनील नारायणला सलामीला पाठवून संघाचं नशीब बदललं, तसाच काहीसा प्रयोग तो भारतीय संघात देखील करू शकतो. रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीर या कामासाठी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला तयार करत आहे. तो आगामी काळात भारतीय संघात सुनील नारायणची भूमिका निभावू शकतो.
गौतम गंभीर केकेआरचा कर्णधार असताना आणि नंतर मार्गदर्शक बनल्यानंतर त्यानं सुनील नारायणला ओपनिंगला पाठवणं सुरू केलं. त्याचा या निर्णय मास्टरस्ट्रोक ठरला. नारायण केकेआरला प्रत्येक सामन्यात धुवांधार सुरुवात करून देऊ लागला, ज्यामुळे संघाचं नशीबच बदललं. केकेआर आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनण्यात सुनील नारायणच्या या फलंदाजीचं मोठं योगदान होतं.
आता रिपोर्ट्स येत आहेत की, गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर हाच फॉर्मुला आजमावू शकतो. गंभीरनं वॉशिंग्टन सुदरला ही जबाबदारी दिली आहे. सुंदर नारायण प्रमाणेच गोलंदाजी आणि फलंदाजी करण्यात सक्षम आहे. रिपोर्ट्सनुसार, गंभीरनं सुंदरला जोरदार हिंटिंगचा रोल दिला आहे. वॉशिंग्टन सुंदरकडून सलग दोन सेशन नंबर 3 वर फलंदाजी करून घेण्यात आली. या दरम्यान त्यानं चौकार आणि षटकार ठोकण्याचा सराव केला. हे पाहून अंदाज लावला जात आहे की, सुंदर भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये हिटरची भूमिका निभावू शकतो.
मात्र जर वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला, तर एका खेळाडूचं टीमममधील स्थान धोक्यात येऊ शकतं. हा खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत यशस्वी आणि शुबमन गिल भारतीय संघासाठी सलामीला येऊ शकतात. मात्र जर सुंदर सलामीला आला, तर दोघांपैकी एकाला बाहेर बसावं लागू शकतं. गिल संघाचा उपकर्णधार आहे. तर यशस्वी सुंदर प्रमाणेच डावखूरा फलंदाज आहे. त्यामुळे अशा स्थितीत यशस्वीचं स्थान जास्त धोक्यात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जचं नशीब बदलेल? रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दिग्गज बनू शकतो मुख्य प्रशिक्षक
राहुल द्रविड, रवी शास्त्री की गॅरी कर्स्टन, भारताचा सर्वोत्तम प्रशिक्षक कोण? आकडे पाहून बसेल धक्का
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याचा यू-टर्न? नताशाच्या पोस्टवर केले हृदय जिंकणारे काम, प्रतिक्रिया झाली व्हायरल