मुंबई: अभिनेत्री सनी लिओनने प्रीमियर फुटसॉलमधील कोचीच्या संघाची सहमालकी घेतली आहे. प्रीमियर फुटसॉलने याची अधिकृत घोषणा काल केली.
सनीने विकत घेतलेल्या संघाचे नाव केरला कोब्राज असे असून प्रीमियर फुटसॉलचा हा दुसरा मोसम आहे. ती या संघाची ब्रँड अँम्बेसडरही तीच आहे.
या मोसमाची सुरुवात १५ सप्टेंबर रोजी होणार असून एनएसीआय, वरळी मुंबई येथे १५-१७ सप्टेंबर रोजी सामने होणार आहे.
पुढची फेरी ही बंगळुरू येथे १९ ते २४ सप्टेंबर कोरामंगला इनडोअर स्टेडियम येथे होणार आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने दुबई येथे २६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे.