आयपीएल स्पर्धेच्या अठराव्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात झालेली आहे. तसेच आज म्हणजेच 23 मार्च रोजी स्पर्धेतील दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघामध्ये खेळला गेला. यामध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाने राजस्थान संघावर 44 धावांनी विजय मिळवला आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादला फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यांनी फलंदाजी करून 287 धावांचं राजस्थान समोर आव्हान उभे केले होते.
या सामन्यामध्ये ईशान किशनने तुफानी पारी खेळत शतकी खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने देखील अर्धशतक करत चांगली कामगिरी केली. याचबरोबर हैदराबादने याही हंगामात पहिल्याच सामन्यात मोठी धावसंख्या उभी केली होती. ईशान किशन या हंगामात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. हैदराबादसाठी ट्रेविस हेडने 31 चेंडूत 67 धावा केल्या.
ईशान किशनने फक्त 45 चेंडूत शतक झळकावले. त्याने 47 चेंडूत 106 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादसाठी त्याने पदार्पण सामन्यात शतकी झुंजार खेळी केली. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. हैदराबाद संघाने पावरप्ले म्हणजेच सुरुवातीच्या 6 षटकातच 94 धावा केल्या होत्या.
हैदराबाद संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या करताना दोन धावांनी मागे राहिला, पण ते रेकॉर्डही त्यांचचं आहे.
हैदराबाद संघाला पुढचा सामना 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळायचा आहे. तसेच त्यानंतर 30 मार्च रोजी दिल्ली विरुद्ध हैदराबादचा सामना होणार आहे. आजच्या सामन्यात हैदराबादने राजस्थानला 287 धावांचं लक्ष दिलेलं होत. तसेच स्पर्धेतील आज तिसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये खेळला जात आहे.